Vanita Kharat: वनिता खरातचा जबरदस्त फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन; तब्बल २४ किलो वजन केलं कमी

Shruti Vilas Kadam

वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री वनिता खरात यांनी आतापर्यंत तब्बल २४ किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला आहे. त्यांच्या या ट्रान्सफॉर्मेशनची सध्या चर्चा होत आहे.

Vanita Kharat

वजन कमी करण्यासाठी घेतली मेहनत

वनिता गेल्या काही काळापासून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया व्हिडीओंमधून त्या व्यायाम आणि डाएटकडे लक्ष देत असल्याचे दिसून आले आहे.

Vanita Kharat

पारंपरिक पद्धतीचाही केला व्यायाम

यापूर्वी वनिताने मुदगालाच्या मदतीने पारंपरिक पद्धतीचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्या एका हाताने, दोन्ही हातांनी तसेच वेगवेगळ्या वजनाच्या मुदगालाने व्यायाम करताना दिसल्या होत्या.

Vanita Kharat

‘नक्की काय शिजतंय’मध्ये केला खुलासा

वनिता नुकतीच ‘नक्की काय शिजतंय’ या मराठी ओटीटी कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिला आतापर्यंत किती वजन कमी केले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने २४ किलो वजन कमी केल्याचे सांगितले.

Vanita Kharat

डाएटमध्येही ठेवतेय नियंत्रण

वनिताने सांगितले की, आता ती पूर्वीप्रमाणे काही पदार्थ खात नाही. मात्र कार्यक्रमात तिने त्या दिवशी ‘चीट डे’ असल्याचे सांगत काही आवडते पदार्थ खाण्याचा आनंद घेतला.

Vanita Kharat

सीक्रेटबद्दल अद्याप उत्सुकता

२४ किलो वजन कमी करण्यामागचे नेमके सीक्रेट काय, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर वनिताने ‘सगळं सांगणार आहे’ असे उत्तर दिले. त्यामुळे तिच्या फिटनेस रुटीनबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Vanita Kharat

आवडते पदार्थही सांगितले

फिटनेसवर लक्ष देत असतानाही वनिता आपल्या आवडत्या पदार्थांबद्दल बोलली. तिला मासे आणि पिठीभात आवडतो, तसेच आईने बनवलेलं माशाचं कालवण विशेष आवडत असल्याचे तिने सांगितले.

Vanita Kharat

Weight Loss Walking: वजन कमी करण्यासाठी १० हजार पावलं चालता? मग, ब्रेक घ्यावा की सलग चालावं, जाणून घ्या योग्य पद्धत

Walking | Saam Tv
येथे क्लिक करा