Gautami Patil saam tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil : "पावसाच्या थेंबापेक्षा तुझा ग्लो लय भारी..."; गौतमी पाटीलला पावसात नाचताना पाहून चाहत्याचे भान हरपले |VIDEO

Gautami Patil Monsoon Reel : नृत्यांगणा गौतमी पाटीलने नुकताच एक छान रील शेअर केला आहे. ज्यात ती पावसात बेभान होऊन नाचताना दिसत आहे. गौतमीच्या डान्सवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.

Shreya Maskar

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

गौतमी पाटीलने पावसाचा घेतला मनमुराद आनंद

रिमझिम पावसात गौतमीने केला भन्नाट डान्स

महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. अनेकजण पावसाचा आनंद घेताना दिसत आहे. अशात लावणी क्वीन गौतमी पाटीलने एक सुंदर डान्स रील शेअर केली आहे. जी पाहून चाहत्यांची विकेट पडली. गौतमी पाटील डोंगरमाथ्यावर पावसाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.सुंदर केशरी रंगाचा ड्रेस, मोकळे केस , कपाळावर बिंदी आणि चेहऱ्यावर क्यूट स्माइल गौतमीचा हा लूक चाहत्यांना वेड लावतोय. व्हिडीओत हिरवागार निसर्ग, धुक्याने वेढलेले डोंगर आणि पावसाच्या सरी पाहायला मिळत आहे.

गौतमी पाटीलने 'चिंब भिजलेले' या मराठी गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. हे एक मराठी रोमँटिक गाणे आहे. हे गाणे २००७ मध्ये रिलीज झालेल्या 'बंध प्रेमाचे' या मराठी चित्रपटातील आहे. या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले असून शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी हे गाणे गायले आहे. तसेच हे गाणे प्रवीण दवणे यांनी लिहिलेले आहे.

चाहत्यांच्या कमेंट्स

गौतमी पाटीलच्या या सुंदर डान्स रीलवरल नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहे. एका युजरने लिहिलं की, "पावसाच्या थेंबांपेक्षा तुझा ग्लो लय भारी वाटतोय..." दुसऱ्या युजरने लिहिलं की, "लग्न करता का ओ माझ्यासोबत?" तिसऱ्या युजरने लिहिलं की, "तुमची स्माईल एक नंबर आहे..." आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं की, " किती क्यूट आहेस तू..." चाहते हार्ट इमोजीचा वर्षाव करत आहेत.

करिअर

गौतमी पाटील मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. नुकतेच तिचे 'हिल हिल पोरी हिला…' हे गाणे रिलीज झाले असून ते सोशल मीडियावर तुफान गाजतेय. या गाण्यात गौतमी पाटीलने कॉमेडी किंग आणि अभिनेते भाऊ कदम यांच्यासोबत भन्नाट डान्स केला आहे. आजवर तिने अनेक मालिका, चित्रपट आणि गाण्यांमध्ये काम केले आहे. साधा-भोळा स्वभाव, सुंदर नृत्य कौशल्य आणि सौंदर्यामुळे गौतमी पाटील प्रेक्षकांना आपलसं करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT