Famous Actress : एक्स बॉयफ्रेंडने थोबाडीत मारली, सिगारेटने चटकेही दिले; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली 'त्या' रात्रीची भयंकर घटना

Famous Actress Ex Boyfriend Burnt Her With Cigarette : टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला सिगारेटने चटके दिल्याचे तिने सांगितले.
Famous Actress Ex Boyfriend Burnt Her With Cigarette
Famous Actress saam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

एक्स बॉयफ्रेंडने अभिनेत्रीला सिगारेटने चटके दिले होते

अभिनेत्राचा एक्स बॉयफ्रेंड मानसिकदृष्ट्या अस्थिर होता

टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री निती टेलर सध्या 'प्राईम व्हिडिओ'च्या 'अलायन्स' (Alliance) या रिअ‍ॅलिटी शोमुळे चांगलीच चर्चेत आहे. या शोमध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. नितीने एका हिंसक नात्यातून बाहेर पडण्याबाबतचा अनुभव सांगितला आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, 'अलायन्स' या शोमध्ये नितीने सांगितले की, तिचा एक्स बॉयफ्रेंड हिंसक प्रवृत्तीचा होता. तिने सांगितल्याप्रमाणे, तिच्या बॉयफ्रेंडने सिगारेटने तिच्या मांडीचा आतील भाग जाळला होता. शोमध्ये त्वचेवर उमटलेली ती खूण दाखवत निती म्हणाली, "माझ्या एक्स बॉयफ्रेंडने एकदा मला सिगारेटने जाळले होते. तो हिंसक आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर होता. एकदा त्याच्या वाढदिवसाच्या रात्री तो अचानक हिंसक झाला. ती परिस्थिती खूप वाईट होती. त्याने मला थोबाडीत मारली आणि मी फक्त 'गुडबाय, भेटूया' असे म्हणून तिथून निघून आले. त्या वेळी मी खूप लहान होते. अशा वयात आपण भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतो, त्यामुळे लोकांचे चारित्र्य योग्यरित्या ओळखण्यात आपली चूक होऊ शकते. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता."

निती टेलर आणि परीक्षित बावा यांनी २०१९ मध्ये साखरपुडा केला आणि त्यानंतर २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. २०२४-२०२५ मध्ये निती आणि परीक्षितच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. निती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

निती टेलर करिअर

निती टेलरने 'कैसी ये यारियां', 'गुलाम' , 'इश्कबाज' आणि 'बडे अच्छे लगते हैं २' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. २००९ मधील 'प्यार का बंधन' या शोद्वारे अभिनेत्रीने टेलिव्हिजनवर पदार्पण केले. 'कैसी ये यारियां' या शोमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. तिने 'झलक दिखला जा १०'सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला.

Famous Actress Ex Boyfriend Burnt Her With Cigarette
Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली शस्त्रक्रिया; 'या' गंभीर आजाराशी देत होती लढा, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com