Akshaye Khanna Dhurandhar : १,२,३ नव्हे अभिनेत्रीने अक्षय खन्नाच्या ७ वेळा थोबाडीत मारली, नेमकं झालं काय?

Akshaye Khanna : 'धुरंधर'मधील अक्षय खन्नाचा अभिनय पाहून चाहते वेडे झाले आहेत. एका सीनसाठी अभिनेत्रीने अक्षय खन्नाच्या तब्बल 7 वेळा थोबाडीत मारली आहे. सेटवर नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.
Akshaye Khanna
Akshaye Khanna DhurandharSAAM TV
Published On
Summary

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला रिलीज झाला.

'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अक्षय खन्नाला 'धुरंधर' चित्रपटातीन एका सीनसाठी अभिनेत्रीने तब्बल सात वेळा थोबाडीत मारली.

आदित्य धर यांचा 'धुरंधर' चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटात अक्षय खन्नाने रेहमान डकोइटची भूमिका साकारली आहे. अभिनेता नवीन कौशिक चित्रपटातील एका सीन मागील कहाणी सांगितली आहे. रेहमान डकोइटच्या टोळीतील डोंगाची भूमिका नवीनने साकारली आहे. नवीन कौशिकने खुलासा केला की, एका सीनमध्ये अक्षयला एक-दोन नव्हे तर तब्बल सात वेळा थोबाडीत मारली गेली.

'धुरंधर' चित्रपटात 'भाभी जी घर पर है' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रेहमानची पत्नी उल्फतची भूमिका करत आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला एक सीन दाखवण्यात आला आहे ज्यामध्ये, सौम्या टंडन तिच्या मोठ्या मुलाच्या मृत्यूबद्दल रेहमान डकोइटवर राग काढताना दिसते. तिच्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळताच ती रडत रुग्णालयात जाते आणि रेहमान डकोइटच्या कानाखाली मारते.

एका मिडिया मुलाखतीत त्यांनी सांगितले की, "या सीनमध्ये सात वेळा रिटेक घेण्यात आले आहे." नवीन म्हणाला, "सौम्या अक्षय सरांच्या थोबाडीत मारण्यासाठी थोडीशी संकोच करत होती. तो सीन दमदार बनवण्यासाठी अक्षय सर एकामागून एक रिटेक घेत होते. अक्षय सरांना इतक्या वेळा थोबाडीत मारण्यात आली पण त्यांनी एकदाही संकोच केला नाही. अक्षय सर आणि आदित्य सर सौम्याला समजावून सांगत होते की, तू या कॅरेक्टरमध्ये उतर...असे समजू नको की तुझ्यासमोर एक स्टार उभा आहे..."

लग्नसोहळ्यात झालेल्या गँगवॉरमध्ये रहेमान आणि उल्फतच्या मोठ्या मुलाचा मृत्यू होतो. त्यामुळे उल्फत रेहमानवर चिडते आणि रागात भावना व्यक्त करत त्याला मारते. सध्या 'धुरंधर' चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' ने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Akshaye Khanna
Kritika Kamra-Gaurav Kapur : कृतिका कामरानं दिली प्रेमाची कबुली; बॉयफ्रेंड गौरव कपूरसोबत पहिल्यांदाच दिसली, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com