Kritika Kamra-Gaurav Kapur : कृतिका कामरानं दिली प्रेमाची कबुली; बॉयफ्रेंड गौरव कपूरसोबत पहिल्यांदाच दिसली, पाहा VIDEO

Kritika-Gaurav Viral Video : प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामराने अलिकडेच आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. नुकतीच ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली.
Kritika-Gaurav Viral Video :
Kritika Kamra-Gaurav Kapur saam tv
Published On
Summary

कृतिका कामरा टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

कृतिका कामराने अलिकडेच गौरव कपूरसोबतच्या ब्रेकफास्ट डेटचे फोटो शेअर करून आपल्या प्रेमाची कबुली दिली.

रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर कृतिका आणि गौरव पहिल्यांदाच एकत्र दिसले.

टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामराने नुकतीच आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. ती क्रिकेट होस्ट गौरव कपूरला डेट करत आहे. दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. रिलेशनशिपची कबुली दिल्यावर पहिल्यादांच दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघांनी पापराझींसमोर छान पोज देखील दिल्या.

कृतिका कामराने ऑफ शोल्डर वेलवेट टॉप आणि निळी जीन्स परिधान केली होती. तिने मिनिमल मेकअप करून आणि मोकळे केस सोडून हा लूक पूर्ण केला होता. तर गौरव कपूरने ग्रे रंगाचे कॅज्युअल टीशर्ट परिधान केले होते. ज्यावर छान सूर्यफुलाचे चित्र होते. दोघेही एकत्र खूपच आनंदी पाहायला मिळाले. त्यांचा हा व्हिजीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्स, लाइक्सचा वर्षाव होत आहे.

कृतिका कामरा आणि गौरव कपूर मुंबईत फिल्म स्क्रीनिंगसाठी गेले होते. दोघांनी अलिकडेच आपल्या ब्रेकफास्ट डेटचे फोटो शेअर करून चाहत्यांना आपल्या नात्याची आनंदाची बातमी दिली. चाहते यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

गौरव कपूर किरत भट्टसोबत 2014 ला लग्नगाठ बांधली आणि 2021 ला त्यांचा घटस्फोट झाला आणि आता गौरव कपूर कृतिका कामराला डेट करत आहे. दोघेही आपल्या क्षेत्रात काम करताना दिसत आहे. कृतिका कामरा नुकतीच 'द ग्रेट शमसुद्दीन' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कृतिका कामराने आजवर अनेक मालिका, शो, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

Kritika-Gaurav Viral Video :
Pranit More-Abhishek Bajaj : "ही दोस्ती तुटायची नाय..."; प्रणित मोरे अन् अभिषेक बजाज पुन्हा एकत्र, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com