Shruti Vilas Kadam
कृतिका देव लवकरच स्टार प्रवाहच्या लपंडाव या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कृतिका देव सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या चाहत्यांना तिची माहिती देत असते.
नाशिकमध्ये जन्मलेल्या कृतिकाने तिचे मानसशास्त्र हा विषय घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून पूर्ण केले.
कृतिका देवने नाटकात काम करत मनोरंजन विश्वात पदार्पण केले.
कृतिका देवने हवाईजादा, हॅप्पी जर्नी, प्राईम टाईम, राजवाडे अँड सन्स, बकेट लिस्ट , पानिपत या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
कृतिका देवने इंटरनेट वाला लव्ह या मालिकेत काम केले आहे.
कृतिका देव एक उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे.