Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली शस्त्रक्रिया; 'या' गंभीर आजाराशी देत होती लढा, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Famous Actress Undergoes Surgery : प्रसिद्ध अभिनेत्री खूप काळापासून गंभीर आजाराशी लढा देत होती. अलिकडेच तिची शस्त्रक्रिया झाली आहे. अभिनेत्रीचे हेल्थ अपडेट जाणून घेऊयात.
Famous Actress Undergoes Surgery
Famous ActressSAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली

अभिनेत्रीची झाली शस्त्रक्रिया

गंभीर आजाराशी देत होती लढा

'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीची अलिकडेच गंभीर शस्त्रक्रिया पार पडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने याचा खुलासा केला आहे. सुमोना चक्रवर्ती ही टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने आपल्या हेल्थ संदर्भात मोठी पोस्ट शेअर करून सर्वकही सविस्तर सांगितले आहे.

सुमोना चक्रवर्तीने सांगितल्यानुसार, ती अनेक वर्ष 'एंडोमेट्रिओसिस' (endometriosis) या आजाराशी लढत होती. अखेर तिने ४ मे रोजी शस्त्रक्रिया केली. गेले २ महिने अभिनेत्री सोशल मीडियापासून दूर होती. त्यामुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या. आता अडीच महिन्यांच्या ब्रेकनंतर सुमोनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सुमोना चक्रवर्ती पोस्ट

"बऱ्याच दिवसांनी कमबॅक करताना आनंद झाला. गेल्या दोन महिन्यांपासून मी प्रसिद्धीपासून दूर होते. मी जाणीवपूर्वक सोशल मीडियापासून दूर राहिले . 4 मे रोजी माझ्यावर एंडोमेट्रिओसिसची शस्त्रक्रिया झाली. मी अनेक वर्षांपासून या आजाराशी लढा देत होती. हा आजार अधिकच बळावला. मी गेले दोन महिने शारीरिक आणि मानसिक उपचारासाठी घालवले आहेत. आणि आज, मी प्रामाणिकपणे म्हणू शकतो की मी बरी आहे."

तसेच अभिनेत्रीने या पोस्टमध्ये डॉक्टरांचे, चाहत्यांचे, कुटुंबाचे आणि तिच्या या कठीण काळातसोबत असलेल्या सर्वांचे आभार मानले आहे. सुमोना चक्रवर्तीने केलेल्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करत आहे. तसेच अभिनेत्री लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

करिअर

सुमोना चक्रवर्तीला 'द कपिल शर्मा शो' मुळे खूप लोकप्रियता मिळाली. तसेच तिने 'बडे अच्छे लगते हैं', 'कॉमेडी सर्कस', 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' मध्ये काम केले आहे. तसेच ती 'खतरों के खिलाडी १४' मध्ये झळकली आहे. अभिनेत्री 'किक' आणि 'बर्फी' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली. चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Famous Actress Undergoes Surgery
Aamir khan wedding : आमिर खान तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर; गौरी स्प्रॅटसोबत बांधली लग्नगाठ, पहिला PHOTO आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com