Gaurav - Akanksha  saam tv
मनोरंजन बातम्या

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Gaurav Khanna Entry In Lock Up 2 : 'बिग बॉस १९' चा विजेता गौरव खन्ना 'लॉक अप २' मध्ये येतो. घटस्फोटाच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला एकमेकांसमोर येतात. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'लॉक अप २'मध्ये आकांक्षाने गौरवसोबत घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले

'लॉक अप २'मध्ये गौरव खन्नाची एन्ट्री

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव-आकांक्षा पहिल्यांदाच एकत्र दिसणार

'लॉक अप २' सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्री आकांक्षा चमोला हिने गौरवसोबतच्या नात्यासंबंधित केलेल्या विधानानंतर ती कायम चर्चेत राहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून गौरव खन्ना आणि आकांक्षा ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. गौरव खन्नाच्या बायकोने आकांक्षाने 'लॉक अप २' मध्ये सांगितले की, ती आणि गौरव घटस्फोट घेणार आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित राहिले.

'बिग बॉस १९' चा विजेता गौरव खन्ना तेव्हा 'खतरों के खिलाडी १५' शूटिंगमध्ये व्यस्त होतो. शूटिंग संपवून आल्यावर अभिनेत्याला आकांक्षाच्या घटस्फोटाच्या विधानावर विचारण्यात आले. तेव्हा गौरव खन्नाने आपल्या बायकोचे कौतुक केले. ती जिंकावी अशी इच्छा व्यक्त केली. या सर्व ड्रामानंतर आता अखेर 'लॉक अप २' मध्ये गौरव खन्नाची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. ज्याचा प्रोमो समोर आला आहे.

गौरव खन्नाला 'लॉक अप २' मध्ये पाहताच आकांक्षा भावुक होते आणि रडू लागते. दोघेही आपल्या कामात व्यस्त होते त्यात घटस्फोटाची चर्चा अशात दोघे एकमेकांच्या समोर आल्यावर खूपच भावुक झाले. दोघांनाही अश्रू अनावर झाले. प्रोमो व्हिडीओत पाहायला मिळते की, गौरव खन्ना शायरी बोलत येतो की, "एक समंदर हे जो काबू में है, एक कतरा है जो मुझसे संभाला नही जाता. एक उम्र बितानी है उसके बगैर पर एक लम्हा है जो मुझसे गुजारा नही जाता..."

गौरव खन्नाला पाहून आकांक्षाला आनंद होतो. गौरव आकांक्षाच्या जेलजवळ येतो आणि म्हणतो की, "बँड वाजवलास तू तर… " गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोलाचे नाते या भेटीनंतर कोणते वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT