Gaurav and Akanksha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gaurav and Akanksha: 'आम्ही वर्षभरापासून वेगळे राहतोय'; बिग बॉस विजेता गौरव खन्ना आणि आकांक्षा यांचा ९ वर्षांचा संसार मोडला

Gaurav and Akanksha: अभिनेत्री आकांक्षा चमोलाने 'लॉक अप सीझन 2'मध्ये गौरव खन्नासोबत घटस्फोट होत असल्याची कबुली दिली. दोघे वर्षभरापासून वेगळे राहत असून परस्पर संमतीने नातं संपवत असल्याचं तिने सांगितलं.

Shruti Vilas Kadam

Gaurav and Akanksha: हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस विजेता गौरव खन्ना आणि अभिनेत्री आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून विविध चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत आकांक्षा चमोलाने स्वतःच त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. 'लॉक अप सीझन 2'च्या प्रीमियरमध्ये तिने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

शोमध्ये स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातील एक मोठं गुपित सांगण्यास सांगितलं असता, आकांक्षाने सांगितले, "मी आणि गौरव घटस्फोट घेत आहोत. आम्ही गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहोत. मात्र ही गोष्ट आजपर्यंत कोणाला सांगितली नव्हती." तिच्या या वक्तव्यानंतर शोच्या होस्टसह सगळेच काही काळ अवाक् झाले.

आकांक्षाने पुढे स्पष्ट केलं की, "आमचं आजही बोलणं होतं. आम्ही एकमेकांचा आदर करतो. मात्र पती-पत्नी म्हणून आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही, हे आम्हा दोघांनाही जाणवलं. आमच्या भविष्यासंदर्भातील विचार पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे परस्पर संमतीने वेगळं होण्याचा आम्ही निर्णय घेतला," असं ती म्हणाली.

गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांनी २०१६ मध्ये प्रेमविवाह केला होता. दोघांची जोडी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. अनेक कार्यक्रमांमध्ये तसेच सोशल मीडियावरही दोघे एकत्र दिसायचे. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा चाहत्यांनी त्यावर विश्वास ठेवला नव्हता. काही महिन्यांपूर्वी या अफवांचं खोट्या असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता आकांक्षाने स्वतःच सत्य समोर आणल्याने सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे.

दरम्यान, गौरव खन्नाने अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आकांक्षाने सांगितल्याप्रमाणे, दोघेही कोणत्याही वादाशिवाय आणि एकमेकांविषयी आदर कायम ठेवत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला असला, तरी दोघांच्या परस्पर समजुतीने घेतलेल्या या निर्णयाचं अनेकांकडून समर्थन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते 'वनरंग २०२६' चे उद्घाटन, ३ दिवस सुरू राहणार उत्सव

NCPला प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला? प्रशांत किशोर NCPचे नवे सल्लागार?

जळगाव हादरले! शाळा परिसरातच दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने सपासप वार; जुन्या वादातून जीवघेणा हल्ला

धिंड आरोपींची, कारवाई पोलिसांवर; मानवाधिकार आयोगाच्या निर्णयावर पुणेकर संतप्त

NEET पेपरफुटी प्रकरणी एकापेक्षा एक खळबळजनक खुलासे, CBI च्या चार्जशीटमध्ये नेमके काय?

SCROLL FOR NEXT