Garambicha Bapu Saam Tv
मनोरंजन बातम्या

Garambicha Bapu: 'गारंबीचा बापू'चा नवा अवतार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रसाद ओक साकारणार 'अफाट बापू'

Garambicha Bapu: श्री. ना. पेंडसे यांच्या गाजलेल्या ‘गारंबीचा बापू’ कथेवर आधारित नवा मराठी चित्रपट नव्या तंत्रज्ञानासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रसाद ओक बापूची भूमिका साकारणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Garambicha Bapu: कोकणच्या मातीत रुजलेली, बंडखोरी, सत्ता आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू उलगडणारी प्रसिद्ध कथा ‘गारंबीचा बापू’ आता नव्या रूपात रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. श्री. ना. पेंडसे यांच्या गाजलेल्या साहित्यकृतीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती गुरुप्रसाद फिल्म्स आणि विषय प्रॉडक्शन्स यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ही कथा नव्या पिढीसमोर मांडली आहे.

कोकणातील हर्णै, मुरुड, आंजर्ले, मुर्डी आणि दापोली परिसराच्या पार्श्वभूमीवर ही कथा आकार घेते. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणासोबतच या भागातील सामाजिक रचना आणि सत्तासंबंधही चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत. गावातील खोताची सत्ता आणि त्या सत्तेतून निर्माण होणारी दहशत या कथेच्या केंद्रस्थानी आहे.

अण्णा खोतच्या सत्तेला बापूचे आव्हान

गारंबी गावात अण्णा खोत या सत्ताधीशाचा दबदबा आहे. त्याच्या जुलमी वर्तनामुळे गावकरी दबलेले असताना त्याला थेट आव्हान देणारा तरुण म्हणजे बापू. स्वतःच्या मनाप्रमाणे जगणारा, कुणाचीही भीड न बाळगणारा आणि आपल्या बंडखोर वृत्तीमुळे ‘अफाट बापू’ म्हणून ओळखला जाणारा हा नायक कथेला वेगळे वळण देतो. या चित्रपटात प्रसाद ओक बापूची भूमिका साकारत आहेत. बापूच्या कलंदर आणि बंडखोर स्वभावाला ते आपल्या अभिनयातून कशा प्रकारे साकारतात, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. देविका दफ्तरदार राधाच्या भूमिकेत दिसणार असून, यतिन कार्येकर अण्णा खोतची भूमिका साकारत आहेत. याशिवाय जयवंत वाडकर मुसा, शशी पेंडसे विठोबा आणि माधवी सोमण मावशी यांच्या भूमिकेत दिसतील. या व्यक्तिरेखांमधून गारंबीच्या जगण्याचे विविध रंग उलगडणार आहेत.

वैशाली सामंत यांच्या संगीताची साथ

चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी वैशाली सामंत यांनी सांभाळली आहे. अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, उर्मिला धनगर आणि वैशाली सामंत यांच्या आवाजातून कोकणच्या लोकसंगीताचा बाज प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. जयसिंग यांच्या छायांकनातून कोकणचे निसर्गसौंदर्य आणि ग्रामीण जीवनशैली पडद्यावर प्रभावीपणे मांडली जाणार आहे. सत्ता, बंडखोरी, प्रेम आणि मानवी स्वभावाच्या विविध छटा सांगणारी ‘गारंबीचा बापू’ची ही कथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे साहित्यकृतीवर आधारित या नव्या चित्रपटाबद्दल मराठी चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Health Awareness : चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीवर पाणी शिंपडणे पडू शकतं महागात, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची गोव्यात सभा

Naag or Naagin : नाग की नागीण? कसं ओळखाल?

Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी? आरोग्यासाठी काय बेस्ट?

Baramati : बारामतीत भीषण दुर्घटना! विहिरीच्या खोदकामावेळी दडी कोसळून 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT