Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

Influencer Death: सिंगरौलीतील ३० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निधी तिवारी यांचा मृत्यू झाला. लाखो फॉलोअर्स असलेल्या निधी यांच्या मृत्यूच्या कारणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट नाही.
influencer Nidhi Tiwari passes away
influencer Nidhi Tiwari passes away Saam Tv
Published On: 

Influencer Death: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ३० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि ‘मिस प्रिटी इंडिया २०२४’ची विजेती निधी तिवारीने शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी आपले जीवन संपवले झाला. मोरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूसा मोड परिसरातील तिच्या घरात ही घटना घडली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

निधी तिवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होती. इंडिया टिव्हीच्या माहितीनुसार, तिचे फेसबुकवर सुमारे ९ लाख, तर इंस्टाग्रामवर सुमारे ७ लाख फॉलोअर्स होते. निधी रील्स आणि विविध प्रकारचा डिजिटल कंटेंट तयार करण्यासोबतच कार्यक्रम आणि ब्यूटी स्पर्धांमध्येही सक्रिय होती.

influencer Nidhi Tiwari passes away
Govinda Affair: 'माझं घर विनाकारण तुटतंय...'; गोविंदाच्या रुमर्ड अफेअरमुळे सुनीता आहुजा हैराण

‘मिस प्रिटी इंडिया २०२४’चा किताब

निधी तिवारीला २०२४ मध्ये ‘मिस प्रिटी इंडिया’चा किताब जिंकला होता. यानंतर तिची प्रसिद्धी आणखी वाढली. सोशल मीडिया, मॉडेलिंग आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून निधीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. तिला भविष्यात अभिनय आणि मनोरंजन क्षेत्रात करियर करायचे असल्याची इच्छा तिने व्यक्त केली होती.

का केली आत्महत्या

वृत्तांनुसार, घटनेपूर्वी शनिवारी सायंकाळी निधी एका व्यक्तीसोबत फोनवर बोलत होती. त्यावेळी काही कारणावरून बोलताना दोघांमध्ये वाद झाला. यानंतर तिने स्वतःला खोलीत बंद केले आणि गळफास लावला. कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही

निधीच्या मृत्यूमागे नेमके कोणते कारण होते, याबाबत सध्या कोणताही ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. मोरवा पोलिसांकडून फोनवरील संभाषणासह घटनेशी संबंधित विविध बाबींची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी मृत्यूचे कारण निश्चित सांगणे योग्य ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com