Game Changer Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Game Changer Collection : राम चरण ठरणार का 'गेम चेंजर'? 'पुष्पा'ला देतोय टक्कर, दुसऱ्या दिवशी किती कमावले?

Game Changer Box Office Collection Day 2 : अभिनेता राम चरणचा 'गेम चेंजर' हा चित्रपट रिलीज होऊन फक्त २ दिवस झाले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर कमाई केली. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'गेम चेंजर' (Game Changer) हा चित्रपट एस. शंकर दिग्दर्शित आहे. या चित्रपटात राम चरणसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी Kiara Advani ) देखील पाहायला मिळत आहे. 'गेम चेंजर' हा चित्रपट ॲक्शन-ड्रामा अन् रोमान्सचा धमाका आहे. 'गेम चेंजर' मध्ये राजकीय पार्श्वभूमी आहे. या चित्रपटात राम चरणने आयएएस अधिकाऱ्याची मुख्य भूमिका साकारली आहे.

'गेम चेंजर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

साऊथ अभिनेता राम चरण ( Ram Charan) याचा 'गेम चेंजर'चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'गेम चेंजर'चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection Day 2) 51.25 कोटी रुपये कमावले आहेत. तर दुसऱ्या दिवशी 21.5 कोटींची कमाई आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

'गेम चेंजर' अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाने एकूण 72.5 कोटी रुपये कमावले आहेत. संडेच्या कलेक्शन नंतर हा आकडा 100 कोटींच्या वर जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 'गेम चेंजर' चित्रपट तेलुगु, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळ या पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. 'गेम चेंजर'चित्रपटाने तेलुगु भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे. 

'गेम चेंजर' चित्रपटात अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची गाणी सुपरहिट ठरली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईने 'गेम चेंजर' 'पुष्पा 2'ला टक्कर देणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शन मधील घसरणमुळे संडेला किती 'गेम चेंजर' कमावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

SCROLL FOR NEXT