Gadar 2 Success Party In Bollywood Celebrity Instagram
मनोरंजन बातम्या

Gadar 2 Success Party: सनी पाजीने करून दाखवलं..., ‘गदर २’ हिट होताच सक्सेस पार्टीचं दणक्यात आयोजन; पार्टीमध्ये बॉलिवूडची मांदियाळी

Gadar 2 Success Party In Bollywood Celebrity: अमिषा पटेल आणि सनी देओलच्या ‘गदर २’ला भरघोस यश मिळाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं.

Chetan Bodke

Gadar 2 Success Party

बॉलिवूडसाठी २०२३ हे वर्ष खूपच खास आहे. कारण, या वर्षात बॉलिवूडला अनेक दमदार, ब्लॉकबस्टर आणि सुपरडुपरहिट चित्रपट मिळाले आहेत. अशातच ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची सोशल मीडियावरच नाही तर चाहत्यांमध्येही तुफान चर्चा होते. ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेला अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ ची सर्वत्र जोरदार चर्चा होतेय. नुकताच चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रमुख हजेरी लावली होती.

लवकरच अमिषा पटेल आणि सनी देओल प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट येत्या काही दिवसात ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. चित्रपटाने आतापर्यंत ४९३ कोटींच्या आसपास कमाई एकट्या भारतात कमाई केली आहे. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा फारच भावली असून चित्रपटाला सर्वच स्तरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच मुंबईमध्ये चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सलमान खान, शाहरुख खान, सारा अली खान, कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, अजय देवगण, काजोल देवगण, आमिर खान, सह अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. सोबतच चित्रपटातील कलाकारही उपस्थित होते.

यावेळी सक्सेस पार्टीमध्ये एक भेट खूपच चर्चेचा ठरली आहे. ही भेट म्हणजे, सनी पाजीची आणि किंग खानची. याचं कारण असं की, ३० वर्षांपूर्वी या दोघांचंही ‘डर’ चित्रपटाच्या दरम्यान काही कारणास्तव भांडण झालं होतं.

यावेळी दोघांनीही जुना वाद विसरून सनी देओलने आणि शाहरूख खानने गळाभेट केलीय. सध्या दोघांचीही ही भेट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. नुकताच शाहरूखच्या ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘जवान’चा ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफावर झळकला आहे. सक्सेस पार्टीसाठी शाहरूख दुबईवरून परतत असतानाच सक्सेस पार्टीला हजेरी लावली आहे. यावेळी दोघांचीही गळाभेट खूप चर्चेचा विषय ठरली आहे.

१९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर’मध्ये सनी देओलने आणि शाहरूख खानने एकत्र काम केले होते. चित्रपटामध्ये सनी देओलने नायकाची तर, शाहरूखने खलनायकाची भूमिका साकारली होती. निर्मात्यांनी चित्रपटामध्ये शाहरूखला जास्त फुटेज दिल्यामुळे सनी पाजी नाराज झाला होता. त्यामुळे सनीने चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत पुन्हा कधीच काम करणार नाही, अशी शप्पथ देखील घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT