मनोरंजन बातम्या

Fifa World Cup: मस्तीखोर रणवीरची चाहत्यासाठी 'एक स्माईल प्लिज', फिफा वर्ल्ड कपमध्ये रणबीर- दीपिकाचे व्हिडीओ व्हायरल...

एका चाहत्याने रणवीर-दीपिकाचा एक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ranveer Singh And Deepika Padukone Video: बॉलिवूडचे लोकप्रिय कपल अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नुकताच पार पडलेल्या फिफा विश्वचषक २०२२ दरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित होते. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्याचा रणवीर आणि दीपिकाने मनापासून आनंद लुटला. त्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक या कपलची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. यादरम्यान एका चाहत्याने रणवीर-दीपिकाचा एक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

FIFA विश्वचषक 2022 च्या फायनल दरम्यान, कतारमधील लुसेल स्टेडियमवर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या उपस्थितीने सर्वत्र रंग भरले. या खास प्रसंगी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्टेडियमध्ये एक चाहता गुपचूप रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा व्हिडिओ शूट करत आहे.

मात्र 'सर्कस' अभिनेता रणवीर सिंग त्या चाहत्याच्या कॅमेऱ्याकडे पाहताच त्याला इशारा देताना दिसत आहे. रणवीर सिंगची ही स्टाइल त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. तसेच रणवीरच्या या हृदयस्पर्शी प्रतिक्रियेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. इतकंच नाही तर रणवीर आणि दीपिकाचा हा व्हिडिओ खूप तूफान व्हायरल होत आहे.

अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यादरम्यान, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण फुटबॉल स्पर्धेत मोहित झाले होते. यादरम्यान रणवीर सिंगने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर दीपिकासोबतच्या अनेक इन्स्टा स्टोरी शेअर केल्या आहेत. या फोटो आणि व्हिडिओंमध्ये रणवीर सिंग त्याची पत्नी दीपिका पदुकोण हे दोघे प्रेमवीर आंनद लुटत आहे.

Edited By- Manasvi Choudhary

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

SCROLL FOR NEXT