Kangana Ranaut: कंगनाने संसद परिसरात 'इमर्जन्सी'च्या शूटिंगसाठी मागितली परवानगी; नेटिझन्सनी केलं ट्रोल...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या वक्तव्याबद्दल तर कधी तिच्या चित्रपटाबद्दल.
Kangana Ranaut
Kangana RanautSaam Tv

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या वक्तव्याबद्दल तर कधी तिच्या चित्रपटाबद्दल. कंगना आता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचा 'इमर्जन्सी' चित्रपट.

कंगना रणौतने 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकसभा सचिवलयाकडे संसद भवन परिसरात शूटिंग करण्याची परवानगी मागितली होती, पण त्यासाठी तिला परवानगी मिळालेली नाही. सोबतच तिला तिथे शूटिंग करण्यासाठी जागा ही मिळणार नसल्याची शक्यता आहे.

Kangana Ranaut
Deepika Padukone: 'तुम्ही ही डिप्रेस झालात?' दीपिकाने दिला चाहत्यांना फ्री राहण्याचा कानमंत्र...

कंगना सध्या 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वृत्तसंस्था पीटीआयने ट्विट केले आहे की, अभिनेत्री कंगना रणौतने संसदेच्या परिसरात तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकसभा सचिवालयाकडे परवानगी मागितली आहे, जी नाकारली जाण्याची शक्यता आहे. तसेच तिच्यावर सोशल मीडियावरुन ही टीका- टीप्पणी होत आहे तर , काही जणांकडूनही तिला समर्थनही मिळत आहे.

Kangana Ranaut
Devdatta Nage: 'जय मल्हार' फेम अभिनेता देवदत्त नागेला अपघात, इन्स्टाग्रामवरून शेअर केली माहिती

‘इमर्जन्सी’चे शूटिंग २०२२ ला जूनमध्येच सुरु झाले होते. कंगनाकडे चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी तिच्याकडे आहे. या चित्रपटात ती १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारताना दिसत आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना कंगनाने म्हणते, “आणीबाणी हा भारतीय राजकीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता, ज्याने विरोधकांचा आपल्या सत्तेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता. म्हणूनच मी ही कथा सांगण्यास जास्त उत्सुक आहे.” कंगना या चित्रपटानंतर कंगना ‘तेजस’मध्ये सुद्धा दिसणार आहे.

Kangana Ranaut
Ankita Lokhande: अंकिता- सुशांतची एक अधुरी प्रेमकहाणी...

कंगना राणौतने अनेकवेळा भाजपच्या समर्थनार्थ वक्तव्य केले आहे. ती भाजपमध्ये जाण्याचीही शक्यता वर्तवली जात होती. केवळ भाजपमध्ये प्रवेशच नाही तर ती हिमाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूकही लढवू शकते असे ही तर्क- वितर्क लढवले जात होते, पण तसे काही झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संसद परिसरात आणीबाणीवर आधारित चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी कंगना रणौतने लोकसभा सचिवालयाला पत्र लिहिले होते. मात्र, यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. संसदेत फक्त दूरदर्शन आणि संसद टीव्हीला शूटिंग करण्याचीच परवानगी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com