Deepika Padukone: 'तुम्ही ही डिप्रेस झालात?' दीपिकाने दिला चाहत्यांना फ्री राहण्याचा कानमंत्र...

डिप्रेशन कोणाला नसते? अगदी सामान्य माणसापासून ते मोठ- मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना डिप्रेशन, टेंशन येतं.
Deepika Padukone
Deepika Padukone Saam Tv
Published On

Deepika Padukone: सध्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण कमालीची चर्चेत आहे. चर्चेत असण्याचे कारण म्हणजे फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण अभिनेत्री दीपिका पदूकोणच्या हस्ते करण्यात आले, दुसरे म्हणजे पठान चित्रपट. या दोन्ही गोष्टींची सध्या सर्वत्र कमालीची चर्चा रंगत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने फिफा विश्वचषक 2022 ची ट्रॉफी लाँच करून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यावेळी दीपिकाचा लुक, तिची फॅशन, तिचे कर्तृत्व या साऱ्याची बक्कळ चर्चा त्या मैदानात होत होती.

Deepika Padukone
Ankita Lokhande: अंकिता- सुशांतची एक अधुरी प्रेमकहाणी...

आता याचेच निमित्त साधत आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत. ती म्हणजे दीपिकाच्या डिप्रेशनची. डिप्रेशन कोणाला नसते? अगदी सामान्य माणसापासून ते मोठ- मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना डिप्रेशन, टेंशन येतं. दीपिकाही या गोष्टीला मुकलेली नाही. दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात ती रडताना दिसुन येत आहे.

Deepika Padukone
Shardul Thakur: शार्दूल ठाकूर अडकणार लग्नबंधनात, मुंबई जवळील 'या' ठिकाणी संपन्न होणार विवाह सोहळा

अनेक दर्जेदार, लोकप्रिय चित्रपट देणाऱ्या दीपिकालाही डिप्रेशनचा सामना एकेकाळी करावा लागला होता. त्यातून तिने मोठ्या कसरतीने, बाहेर येत ग्रेसफेल आयुष्य जगण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे डिप्रेशन आलं तरी कशी मात करायची हे दीपिकाकडून शिकणं गरजेचं आहे.

दीपिका २०१२ पासून सतत ३ वर्ष डिप्रेशनचा सामना करत होती. आता आपलं आयुष्य संपलं अशी भावना नेहमी तिच्या मनात यायची. पण 2015 मध्ये ती यातून बाहेर पडल्याचे एका मुलाखतीत तिने स्पष्ट केले होते.

दरम्यान दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते,'माझ्यासाठी तो काळ खूपच वाईट होता, तेव्हा माझ्या आईला माझ्यामध्ये नैराश्याची बरीच लक्षणं दिसत होती. तिने मला डॉक्टरांचा योग्य सल्ला ही घेण्यास सांगितले. माझ्या आईने एक काउन्सिलरही नेमला होता.

मला जर कोणीच साथ दिली नसती तर, मी इतक्या लवकर बरी झालेच नसते.जेव्हा तुम्हाला डिप्रेस वाटेल किंवा डिप्रेशनमध्ये चाललोय असे वाटेल तेव्हा योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे, मेडिटेशन आणि जवळच्या लोकांशी गोष्टी शेअर करणे विसरू नका.'

Deepika Padukone
Rasika Dugal : मिर्जापूर फेम रसिकाचा हॉट लूक व्हायरल; फोटो पाहिले का?

सोबतच पुढे दीपिका म्हणते, 'तुम्हाला ज्या गोष्टी फार आवडत असतील त्या गोष्टींचा आधार घेत, स्वत:चा वेळ कसा काय देता येईल हा विचार करा. मी मोठी होत होते, तेव्हा वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती की, सर्वोत्तम होण्यासाठी, शिस्त, समर्पण आणि दृढनिश्चय (डिसीप्लिन, डेडिकेशन, डिटरमिनेशन) हे तीन 'डी' फार महत्वाचे आहे. ते आपले कधीही आयुष्य पूर्ण पणे बदलून टाके शकते. आपल्या मनाला जे योग्य वाटेल ती गोष्ट नेहमी करायची. मीही हेच केले आणि डिप्रेशनमधून बाहेर पडले.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com