Akshay Athre google
मनोरंजन बातम्या

Akshay Athare: सोशल मीडिया स्टार ते अभिनेता; अक्षय आठरेचा प्रेरणादायी प्रवास, युवकांसाठी तो ठरतोय आयडॉल

Social media star akshay athare journey: अक्षय आठरे याने काही काळातच सोशल मीडीयावर प्रसिद्धि मिळाली. सोशल मीडीयावर मनोरंजनात्मक व्हिडिओ बनवून लोकांची पसंती मिळवली. आज तो सोशल मीडीया स्टार सोबतच कलाक्षेत्रातही त्याने पदार्पण केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया स्टार आणि अभिनेता अक्षय आठरे याने नोकरी न करता व्यवसाय करण्याची इच्छा ठेवली. परंतु सोशल मीडीयावर सहज अपलोड केलेले व्हिडीओने त्याला अपेक्षा पलीकडे जाऊन यशाच्या शिखरापर्यंत पोहचवले. अक्षयच्या इंस्टाग्रामवर ७ लाख ६३ हजार फालोअर्स अाहे. तो पूर्णवेळ सोशल मीडीयासाठी व्हिडिओ बनवण्याचे काम करत आहे. त्याच्या प्रेरणादायी प्रवासामुळे तो अनेक तरुणांचा आयडॅाल ठरत आहे. माझ्या भाऊराया, साज तुझा, फितूर, जीव नादावला अश्या अनेक म्युझिक अल्बममध्ये त्याने काम केले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात राहणा-या अक्षय आठरे याने आपले शालेय शिक्षण बळीराम पाटील विद्यालयातून पूर्ण केले. वडिल कंपनीत कामगार तर आई गृहिणी आहे. त्याने एमआयटी महाविद्यालयातून मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना त्याने लाईक अॅपवर सहज मनोरंजनात्मक व्हिडीओ अपलोड केले. यात त्याच्या व्हिडीओला भरपूर लाईक्स मिळाले. त्याने गाण्यावर तर कधी डायलॉगवर लिप्सिंग करत केलेल्या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी अक्षयने सोशल मीडियालाच करिअर म्हणून मार्ग निवडला.

इंजिनिअरींच्या शेवटच्या वर्षांत असताना सोशल मीडीयातून मिळालेल्या पैशातून अक्षयने आयफोन घेतला. परंतु बाहेरचे लोक त्याला टोमणे मारायचे. त्यामुळे वडिलांनासुध्दा मुलाने शिक्षण करून नोकरी करावी असे वाटत होते. मात्र आईकडून सोशल मीडियासाठी सपोर्ट मिळत गेला. वडिलांसोबत बाहेर गेल्यानंतर त्याला ओळखणारे लोक अक्षयसोबत फोटो काढायला यायचे. अक्षयचे वडील बाहेर गेल्यानंतर तुम्ही अक्षयचे वडील ना..असे लोक विचारायचे. त्यामुळे वडिलांनासुध्दा अक्षय काहीतरी चांगले काम करतोय हे पटले अन् त्यांनीही त्या समर्थन दिले.

अक्षयने सखी आणि सखा या नावाने सलूनसुध्दा उभारले. १० विविध प्रकारच्या अल्बमध्ये अॅक्टिंग केली आहे. काही काळातच त्याने कंटेट क्रिएटर, युटयूबर, अॅक्टर अशाप्रकारची आपली ओळख निर्माण केली. कोणतेही प्रशिक्षण न घेता त्याने स्वतः व्हिडिओ बनवले. त्याने रोमांटिक, लिपसिंग अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले. त्याच्या या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळाली.

अक्षयने याच्या मदतीने स्वतःच्या पैशाची कार घेतली आणि व्यवसाय सुरु केला. आज अक्षयला विविध मालिका आणि चित्रपटात काम करण्याचे ऑफर मिळत आहेत. सोशल मीडियावर काम केल्यानंतर कमाईमध्ये वाढ होत गेली. ती हजारापासून लाखोपर्यंत गेली, आणि महत्वाचे म्हणजे व्हिडीओ लोकांना आवडले तेच माझ्यासाठी यशाची खरी पावती आहे. 'युवकांनी शिक्षण करावे. नोकरी, व्यवसाय करून सोशल मीडीयाकडे वळले पाहिजेत. आपल्या हातात पैसे कमविण्याचे दोन -तीन मार्ग असावेत. पूर्णवेळ सोशल मिडीयाला करिअर म्हणून पाहू नये', असा अक्षय सांगतो.

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT