Aishwarya Rai : ऐश्वर्याच्या 'त्या' व्हिडीओनं वेधलं लक्ष; चक्क 'बच्चन' आडनाव गायब, नेमकं प्रकरण काय?

Aishwarya Rai Viral Video : सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तिने 'बच्चन' आडनाव हटवल्याचे पाहायला मिळत आहे.
Aishwarya Rai Viral Video
Aishwarya Rai SAAM TV
Published On

गेल्या काही महिन्यांपासून बच्चन कुटुंब चर्चेत पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाची चर्चा पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या रायही (Aishwarya Rai) बॉलिवूडची क्वीन आहे. तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे. तसेच तिने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याची चर्चा सुरू असताना ऐश्वर्याचा दुबईतील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, ऐश्वर्याने आपल्या नावातून बच्चन आडनाव हटवले आहे. तिच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

नुकतीच दुबईतील ग्लोबल वुमेन फोरम कार्यक्रमात ऐश्वर्या रायने हजेरी लावली होती. यात तिने महिला सुरक्षितता आणि सशक्तीकर याबद्दल आपले मत मांडले. जेव्हा तिला मंचावर बोलावले तेव्हा स्क्रीनवर तिच्या दिसणाऱ्या नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या नावात 'बच्चन' हे आडनाव दिसले नाही. यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आले आहे. 'इंटरनॅशनल स्टार ऐश्वर्या राय' असे लिहिलेले स्क्रीनवर पाहायला मिळत आहे.

ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चित्रपटाचे अपडेट आणि आयुष्यातील काही खास क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. ऐश्वर्या अजूनही अभिषेक बच्चनला इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे. ऐश्वर्याचे इंस्टाग्रामवर 14.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. ऐश्वर्याने या कार्यक्रमासाठी निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.

आराध्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये देखील कुठेच बच्चन कुटुंब पाहायला मिळाले नाही. एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये ऐश्वर्याच्या नावासमोर बच्चन आडनाव नसल्यामुळे सर्वत्र ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

Aishwarya Rai Viral Video
Dhanush-Aishwarya : रजनीकांत यांच्या लेकीचा संसार मोडला! धनुष अन् ऐश्वर्याच्या १८ वर्षांच्या संसाराला पूर्णविराम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com