Los Angeles Fire Priyanka chopra Google
मनोरंजन बातम्या

Los Angeles Fire : कॅलिफोर्निया-लॉस एंजिल्समध्ये अग्नितांडव, हॉलिवूड स्टार्सची घरे जळून खाक, प्रियांका चोप्राने शेअर केला व्हिडीओ

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने लॉस एंजेलिसच्या जंगलातील आगीचा व्हिडिओ शेअर केला आहे. एडम ब्रॉडी, अँथनी हॉपकिन, पॅरिस हिल्टन या हॉलिवूड कलाकारांना त्यांची घरे गमावली आहेत.

Shruti Vilas Kadam

Los Angeles Fire : लॉस एंजेलिसमध्ये राहणारी बॉलीवूड स्टार प्रियांका चोप्राने तिच्या घराेसमोरील जंगलातील आगीचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये बाधित भागात राहणाऱ्या लोकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये दूरवर वेगाने पसरणाऱ्या आगी पाहायला मिळत आहेत .

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये भीषण आग लागली, ज्यामध्ये अनेक हॉलिवूड स्टार्सची घरे जळून खाक झाली आहेत. लॉस एंजेलिसमधील पॅलिसेड्समध्ये लागलेल्या आगीच्या ज्वाळांमध्ये अनेक लोक अडकले आहेत. या आगीने १५,८०० एकरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापले आहे. कॅल फायरच्या मते, किमान १,५०० इमारती जळून खाक झाल्या आहेत, ज्यामध्ये अनेक हॉलिवूड स्टार्सच्या घरांचा समावेश आहे.

लॉस एंजेलिस आणि आसपासच्या जंगलातील आगीमुळे मार्क हॅमिल, मँडी मूर आणि जेम्स वुड्स सारख्या मोठ्या नावांसह अनेक स्टार्सची घरे नष्ट झाली. अमेरिकन गायिका मँडी मूर आणि जेम्स वुड्स यांनी बुधवारी सांगितले की, या विनाशकारी आगीत त्यांचे सर्वस्व गेले आहे.

४५ वर्षे जुने घर गमावले

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता बिली क्रिस्टल यांचे जुने घर जळून खाक झाले. हॉलिवूड अभिनेता बिली क्रिस्टल आणि त्यांची पत्नी जेनिस यांनी सांगितले की, त्यांचे ४५ वर्ष जुने घर या आगीत जळून खाक झाले आहे. तो १९७९ पासून या घरात राहत होता. प्रसिद्ध विनोदी कलाकार विल रॉजर्स यांच्या घरही जळून खाक झाले. १९२९ मध्ये बांधलेले रॉजर्सचे रॅंच हाऊस आणि विल रॉजर्स स्टेट हिस्टोरिक पार्कमधील इतर इमारतीही जळून खाक झाल्या.

५ जणांना आपला जीव गमवावा लागला

एडम ब्रॉडी, लेइटन मीस्टर, फर्गी, अॅना फॅरिस, अँथनी हॉपकिन्स आणि जॉन गुडमन यांची घरेही जळून खाक झाली. यासोबतच, हजारो लोकांना त्यांच्या घरातून बेघर व्हावे लागले आहे. या आगीत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. या वणव्यात आतापर्यंत किमान ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT