Chidiya Udd : एक गलती और खेल खत्‍म!; जॅकी श्रॉफच्या नवीन क्राईम ड्रामा 'चिडिया उड'चा ट्रेलर Out

Chidiya Udd Trailer : जॅकी श्रॉफ, सिकंदर खेर आणि भूमिका मीना अभिनीत 'चिडीया उड' वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ही वेब सिरीज लवकरच मोफत प्रीमियर होणार आहे.
Chidiya Udd Trailer
Chidiya Udd TrailerGoogle
Published On

Chidiya Udd : अभिनेते जॅकी श्रॉफ, सिकंदर खेर आणि भूमिका मीना यांच्या 'चिडिया उड' या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नवीन क्राईम ड्रामा वेब सिरीज OTT वर मोफत उपलब्ध असेल. होय, यासाठी वापरकर्त्यांना कोणत्याही प्रकारच्या सबस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. मालिकेची कथा 1990 च्या दशकातील मुंबईतील धोकादायक जगावर बेतलेली आहे. त्यात अंडरवर्ल्ड, वेश्याव्यवसायाच्या दुनियेतीळ सत्य, खेड्यातील मुलींच्या अनंत वेदना आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याची त्यांची धडपड दाखवण्यात आली आहे. निर्मात्यांनी एक दिवस आधी त्याचा टीझरही रिलीज केला होता. आता ट्रेलर रिलीजसोबतच रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या वेबसिरीजची कथा मोहिंदर प्रताप सिंग आणि चिंतन गांधी यांनी लिहिली आहे. 'चिडिया उड' ही वेब सिरीज आबिद सुर्ती यांच्या 'केज' या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. जॅकी श्रॉफ खलनायक तर भूमिका मीना मुख्य भूमिकेत आहे. यात सिकंदर खेर, मधुर मित्तल, मयूर मोरे आणि मीता वशिष्ठ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

काय आहे 'चिडिया उड'ची कथा?

'चिडिया उड'ची निर्मिती हरमन बावेजा आणि विकी बहरी यांनी केली आहे. कथेच्या केंद्रस्थानी सहार (भूमिका मीना) नावाची मुलगी आहे. ती राजस्थानातील एका गावातून मुंबईत आली आहे. पण ती गुन्हेगारी आणि वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकते. वेश्यागृहाच्या साखळदंडातून स्वतःला मुक्त करण्यासाठी ती लढते. पण त्याच्या मार्गात कादिर खान (जॅकी श्रॉफ) उभा आहे. जो या कुप्रसिद्ध जगावर राज्य करतो.

या मालिकेत कादिर खानची भूमिका साकारणारा जॅकी श्रॉफ म्हणतात, 'चिडिया उडची दुनिया चढ-उतारांनी भरलेली आहे. ही एक अशा ठिकाणाची कथा आहे जिथे जगणे हा अंतिम खेळ आहे आणि प्रत्येक पात्र स्वतःची लढाई लढत आहे. सहारची भूमिका साकारणारी भूमिका मीना म्हणते, 'माझ्यासाठी हा विश्वासाच्या पलीकडचा प्रवास होता. सहार एक योद्धा आहे जी प्रतिकूलतेसमोर नतमस्तक होण्यास नकार देते. ही तिच्या जगण्याच्या लढ्याची ही कहाणी आहे.

'चिडिया उड' कधी आणि कुठे पाहता येईल

बावेजा स्टुडिओच्या बॅनरखाली बनलेला 'चिडिया उड' 15 जानेवारी 2025 रोजी Amazon MX Player वर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारच्या सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर विनामूल्य प्रसारित करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com