FIR On Sanjay Leela Bhansali Saam Tv
मनोरंजन बातम्या

FIR On Sanjay Leela Bhansali: चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या विरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

FIR On Sanjay Leela Bhansali: चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांच्यासोबत 'लव्ह अँड वॉर' नावाच्या चित्रपटावर काम करत आहेत. एका प्रकरणात भन्साळींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

FIR On Sanjay Leela Bhansali: प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात बिकानेर शहरात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर फसवणूक, गैरवर्तन आणि विश्वासघाताचा आरोप केला आहे. केवळ संजय लीला भन्साळीच नाही तर इतर दोन लोकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक राज माथूर नावाच्या व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे.

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, बीकानेर सदर सर्कल ऑफिसर विशाल जांगिड म्हणाले की, प्रतीक राज माथूर नावाच्या या व्यक्तीचा दावा आहे की संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटासाठी लाइन प्रोड्यूसर म्हणून त्यांच्यासोबत करार केला होता, परंतु नंतर तो रद्द केला.

संजय लीला भन्साळी यांच्यावर काय आरोप आहे?

संजय लीला भन्साळींवर असा आरोप आहे की भन्साळी आणि त्यांच्या टीममधील दोन लोकांनी त्यांच्यावर लाईन प्रोड्यूसरची जबाबदारी सोपवली आणि नंतर पैसे न देता त्यांना प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. सोमवारी, भन्साळी आणि त्या दोघांविरुद्ध बिचवाल पोलिस ठाण्यात फसवणूक, गुन्हेगारी कट आणि इतर अनेक आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणबीर कपूर आणि विकी कौशल चित्रपटाचा भाग

'लव्ह अँड वॉर' हा एक मोठा आगामी बॉलिवूड चित्रपट आहे. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसणार आहेत. भन्साळींवर आरोप करणारा व्यक्ती राज माथूरचा दावा आहे की त्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सरकारी विभागांशी संपर्क साधण्यासह सर्व आवश्यक व्यवस्था केल्या होत्या. तथापि, जेव्हा तो भन्साळींना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेला तेव्हा तेथे त्याच्याशी गैरवर्तन करण्यात आले. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

संजय लीला भन्साळी यांनी जानेवारी २०२४ मध्ये 'लव्ह अँड वॉर'ची घोषणा केली होती. त्यावेळी असे म्हटले जात होते की हा चित्रपट २०२५ च्या ख्रिसमसला प्रदर्शित होईल. पण, नंतर असे वृत्त समोर आले की हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. हा चित्रपट मार्च २०२६ मध्ये थिएटरमध्ये दाखल होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT