Bigg Boss 19: तान्या मित्तल नाही तर, 'हा' आहे प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक; 'बिग बॉस १९'च्या वोटिंगमध्ये कोणी मारली बाजी?

Bigg Boss 19: बिग बॉस १९चा दुसऱ्या आठवडा सुरु आहे. पहिल्या आठवड्यात सलमान खानच्या वादग्रस्त शोमध्ये तान्या मित्तलचे सलमान खानकडून बरेच कौतुक झाले, पण प्रेक्षकांच्या मनावर दुसऱ्याच कोणीतरी राज्य केले.
Bigg Boss 19
Bigg Boss 19Saam Tv
Published On

Bigg Boss 19: सलमान खानचा शो बिग बॉस १९ च्या पहिल्या आठवड्यात घरात खूप मजा आली. गुप्त खोलीतून बाहेर पडताच फरहाना भट्टने बसीर अलीला फटकारले, तर तान्या मित्तलने कुनिका मित्तलला कॅप्टन बनवण्याचा निर्णय घेतला. याचसोबत घरात जेवणाबाबत महाभारत सुरू झाले. यामध्ये प्रेक्षकांना कोण आवडतयं याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

आठवड्याच्या शेवटी झालेल्या भांडणात प्रणित मोरेला फटकारले गेले, तर तान्या मित्तलला सलमान खानकडून तिच्या खेळाबद्दल कौतुकाची थाप मिळाली. सर्वांना वाटले की पहिल्या आठवड्यात तान्या मित्तलचा खेळ सर्वात आवडला असेल. पण, ज्या स्पर्धकाचा खेळ प्रेक्षकांना सर्वात जास्त आवडला आणि तिला भरपूर मते दिली ती तान्या नाही तर दुसरी कोणीतरी आहे.

Bigg Boss 19
The Bengal Files: मी दोषी आहे, मला शिक्षा द्या...; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना संदेश, पाहा VIDEO

या स्पर्धकाने पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांची मने जिंकली

खाण्यापासून ते झोपेपर्यंतच्या मुद्द्यांवरून स्पर्धक घरात कितीही भांडत असले तरी प्रेक्षकांचे मन तोच जिंकतो जो त्यांना समजूतदार वाटतो. पहिल्या आठवड्यात ज्या स्पर्धकाने प्रेक्षकांना सर्वात जास्त खूश केले तो दुसरा तिसरा कोणी नसून अनुपमा स्टार गौरव खन्ना आहे, ज्याला प्रेक्षकांकडून सर्वाधिक मते मिळाली आहेत.

Bigg Boss 19
Actress Death: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीचं निधन; वयाच्या ३९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बीबी तकने त्यांच्या एक्स अकाउंटवर पहिल्या आठवड्याचा प्रेक्षक पोल शेअर केला आहे, यामध्ये कोणत्या स्पर्धकाचा गेम त्यांना सर्वात मनोरंजक वाटला याचा उल्लेख आहे. सर्वोत्तम गेम खेळणाऱ्यांच्या यादीत तान्या मित्तल, अभिषेक बजाज, गौरव खन्ना आणि बसीर अली यांचा समावेश आहे. या पोलमध्ये, ३३.१% लोकांना गौरव खन्नाचा गेम मनोरंजक वाटला आहे. त्यानंतर अभिषेक बजाज दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याला २९% मते मिळाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com