Farhan Akhtar New Film Farhan Akhtar/Instagram
मनोरंजन बातम्या

Farhan Akhtar Post : अभिनेता फरहान अख्तरच्या एका फोटोनं सस्पेन्स वाढला!

Farhan Akhtar hints new film : अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं भलताच सस्पेन्स वाढला आहे.

Sneha Dhavale

अभिनेता फरहान अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे. फरहाननं त्याच्या पोस्टमध्ये लडाखचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. ज्यात लडाखचं अप्रतिम निसर्गसौंदर्य कैद करण्यात आलं आहे. फरहानच्या एका पोस्टनं चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. फरहान आता नेमकं नवं काय करतोय, नवा कोणता चित्रपट घेऊन येणार आहे? असे एक ना अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

प्रत्येक वेळी वेगळ्या धाटणीचे चित्रपट (Bollywood Film) घेऊन येणारा अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं एक कॅप्शन दिली आहे. त्यामुळं तो नेमकं नवं काय घेऊन येतोय, याबाबतची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे.

फरहानच्या पोस्टमध्ये काय?

'लक्ष्य' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमांनंतर एका नव्याकोऱ्या सिनेमाच्या शूटिंगसाठी आपण लडाखला आल्याचं फरहाननं आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. यासोबत लडाखच्या एका ठिकाणचा फोटो पोस्ट केला आहे.

आता प्रश्न उरतो की, फरहानचा हा नवा किंवा येऊ घातलेला नवा चित्रपट कोणता असेल? कदाचित 'डॉन 3' किंवा 'जिंदगी ना मिलेगी दोबाराचा' सिक्वेल तर नसेल, असा प्रश्न चाहत्यांना पडला असून, या पोस्टनंतर फरहानच्या चाहत्यांनी प्रश्नांचा तुफान मारा सुरू केला आहे.

लडाखमधील हे ठिकाण नेमकं कुठलं?

फरहानच्या नव्या सिनेमाविषयी आपण कमालीचे उत्सूक असल्याचं काही चाहत्यांनी म्हटलं आहे. कारण 'लक्ष्य', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'भाग मिल्खा भाग' या सिनेमांमध्ये फरहान अख्तरनं आत्तापर्यंत लडाखच्या एकाहून एक अशा सरस लोकोशन्सचा वापर केला होता. ज्यात पँगॉन्ग लेक, हेमिस मॉन्टेसरी आणि लेह पॅलेसचे निसर्गसौंदर्य देखील पाहायला मिळाले होते.

खरं तर 2024 च्या सुरुवातीलाच फरहाननं अभिनेता रणवीर सिंगसोबत डॉन 3 ची घोषणा केली होती. त्यामुळं आता त्याच्या आगामी सिनेमात लडाखचं आणखी कोणतं वेगळं ठिकाण असणार का, याबाबत उत्सुकता वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT