ज्या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे. नुकतेच ‘डॉन ३’ (Don 3)ची घोषणा झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक शाहरूख खानच्या डॉन २ (Don 2) नंतर ‘डॉन ३’ (Don 3)ची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची आता वाट पाहण्याची वेळ संपली आहे. नुकतंच फरहान अख्तरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘डॉन ३’ ची घोषणा केली आहे.
दिग्दर्शक ‘Don 3’च्या माध्यमातून नवं युग घेऊन येत आहेत, असंही फरहानने सांगितले. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत आपण डॉनच्या सिक्वेलमध्ये शाहरूखला पाहिले होते, पण ‘डॉन ३’ मध्ये शाहरूख खानऐवजी अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामुळे सध्या चाहते खूपच भडकले आहेत.
फरहान अख्तरने सोशल मीडियावर ‘डॉन ३’चा नुकताच एक अनाउंसमेंट करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याने चित्रपटात नेमके कोणते स्टार कास्ट आहे, याबद्दलची माहिती दिलेली नाही. काही मीडिया रिपोर्टसनुसार, रणवीर सिंगने शाहरूख खानला या चित्रपटात रिप्लेस केले आहे. मात्र शाहरुखच्या चाहत्यांना रणबीर चित्रपटात असल्याचे मुळीच मान्य नाही. सध्या सोशल मीडियावर ‘डॉन ३’ कमालीचा ट्रेंडिंगवर आला आहे.
गेल्या काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर ‘डॉन ३’ची अनाउंसमेंट व्हिडीओ शेअर करण्यात आली असून अनाउंसमेंट व्हिडीओ काही तासातच कमालीची चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘डॉन ३’चा अधिकृत टीझर लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘गदर २’च्या प्रदर्शनादरम्यानच ‘डॉन ३’ चा ही टीझर प्रदर्शित होणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. (Bollywood Film)
२००६ मध्ये शाहरूखच्या ‘डॉन’चा पहिला भाग तर २०११ मध्ये, ‘डॉन २’ प्रदर्शित झाला होता. या दोन्हीही भागांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले आहेत. ‘डॉन ३’ची सध्या सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा होत आहे. (Entertainment News)
संजय लीला भन्साळी यांच्या बैजू बावरा या आगामी चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर ‘डॉन ३’ ची शूटिंग सुरू करणार असल्याचे समजत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार असून हा चित्रपट २०२५मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.