Urmila Nimbalkar Podcast Interview You Tube
मनोरंजन बातम्या

Urmila Nimbalkar Interview: 'मालिकेतून काढून टाकलं..., मी डिप्रेशनमध्ये गेली', उर्मिला निंबाळकरने सांगितला वाईट काळातला अनुभव

Urmila Nimbalkar News: उर्मिला निंबाळकरने आपल्या चाहत्यांसोबत तिचा आजवरचा संपूर्ण प्रवास एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे.

Chetan Bodke

Urmila Nimbalkar Podcast Interview

एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणून सर्वत्र चर्चेत असलेली उर्मिला निंबाळकर सध्या चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनय क्षेत्रातून अचानक लांब जात लोकप्रिय यूट्यूबर म्हणून तिची चाहत्यांमध्ये ओळख निर्माण झाली. सध्या उर्मिला तिच्या एका ब्लॉगमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. हा ब्लॉग अभिनेत्रीने नुकताच युट्यूबवर शेअर केला असून तिने स्वत:ची ओळख युट्यूबच्या माध्यमातून विशेष बनवली आहे. तिचा युट्यूबवर १ मिलियन इतके सबस्क्रायबर्स असून तिने आपल्या चाहत्यांसोबत तिचा आजवरचा संपूर्ण प्रवास एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे.

उर्मिलाने तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडीओत, सिनेसृष्टीमध्ये तिला आलेले अनेक चांगले, वाईट अनुभव तिने शेअर केले. मालिकेतून अचानक कशाप्रकारे काढून टाकण्यात आलं?, त्यानंतर डिप्रेशनचा करावा लागलेला सामना अशा अनेक गोष्टींवर तिने मुलाखतीत भाष्य केलंय. अनुभव शेअर करताना उर्मिला म्हणाली, मी मालिकेच्या सेटवर आल्यानंतर माझ्याकडे सगळेच दुर्लक्ष करायला लागले. ज्यावेळी मी सेटवर गेले तेव्हा, माझ्याकडे मेकअप आर्टिस्टही पाहत नव्हते. प्रत्येक जण एकमेकांवर आपआपले काम ढकलंत होते. नेमकं काय चाललंय, मला काहीच कळत नव्हतं. अशातच मला प्रॉडक्शनमधून एका मुलीने मला येऊन सांगितले की, चॅनलने मला मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.”

आपल्या मुलाखतीत पुढे अभिनेत्री म्हणते, त्यावेळी मला मी शुन्य आहे, असं जाणवत होते. मला माझी किंमत शुन्य वाटत होती. माझ्याहून शुन्य कोणीच नाही. अशी माझ्या मनात भावना होती. त्यानंतर पुढे मला प्रॉडक्शन हाऊसने एका ठिकाणी नेलं आणि सांगितलं की, तू सारखी आजारी असतेस आणि सही करून घेतली की तू स्वतःहून मालिका सोडतेस. माझा आत्मविश्वास खचला, माझ्या दिसण्यावरूनही मला अनेक कमेंट्स येत होत्या.

सोबतच आपल्या पुढे मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, २०१६ मध्ये मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. मी सेटवर बेशुद्ध पडले होते. मी त्या कागदपत्रांवर सही केली म्हणून त्यांचं नाव घेऊ शकत नव्हते. खूप गोष्टी गमावल्या, पैसे गेले, खूप गोष्टी केल्या, दोष कोणाला दिला जातो! मी सर्वांना मालिका सोडली असंच सगळ्यांना सांगितलं. पण कोणालाच माहित नव्हतं की, मला काढलं गेलंय. मी सेटवर माज करायचे म्हणून मला काढलं अशा चर्चा सर्वत्र होत होत्या.” दरम्यान अभिनेत्रीने ही मुलाखत तिच्या युट्यूब अकाऊंटवर शेअर केली असून सध्या सर्वत्र ही मुलाखत कमालीची चर्चेत आली आहे.

दरम्यान उर्मिला निंबाळकरबद्दल बोलायचं तर, तिचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. उर्मिला निंबाळकर एक प्रसिद्ध अभिनेत्री नाही तर, एक युट्यूबर आहे. मराठमोळ्या उर्मिलाने आता गुगल भरारी घेतली. गुगल इंडियाकडून उर्मिलाला आमंत्रण मिळालं असून देशातील मानाच्या क्रिएटर्समध्ये तिला स्थान मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT