Marlene Ahuja Passed Away: देओल कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

Bobby Deol Wife Tanya Deol Mother Marlene Ahuja Dies: देओल कुटुंबीयांमध्ये चित्रपटाने मिळवलेल्या भरघोस यशानिमित्त आनंदाचं वातावरण असतानाच, त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Bobby Deol Wife Tanya Deol Mother Marlene Ahuja Dies
Bobby Deol Wife Tanya Deol Mother Marlene Ahuja DiesInstagram

Bobby Deol Mother In Law Death

सध्या देओल कुटुंबीय ‘गदर २’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘गदर २’ चित्रपटाने नुकताच बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. नुकताच शनिवारी या ‘गदर २’च्या कलाकारांनी सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी देओल कुटुंबीयही उपस्थित होतं. सध्या देओल कुटुंबीयांमध्ये चित्रपटाने मिळवलेल्या भरघोस यशानिमित्त आनंदाचं वातावरण असताना, त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बॉबी देओलची पत्नी तान्या देओलच्या आईचे निधन झाले. तिच्या आईचे नाव मर्लिन अहूजा असून त्यांच्या निधनामुळे देओल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Bobby Deol Wife Tanya Deol Mother Marlene Ahuja Dies
HBD Pankaj Tripathi: मला ईश्वरने पाठवलय... पंकज त्रिपाठीनी चित्रपटात काम मिळविण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल

मिळालेल्या माहितीनुसार, तान्याची आई मर्लिन देओल गेल्या काही दिवसांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. त्यांचे २ सप्टेंबर रोजी सायंकाळी आजारपणामुळे निधन झालंय. आपल्या आईच्या निधनाचे वृत्त ऐकून बॉबी देओलची पत्नी तान्या देओल शोकसागरात बुडाली आहे. मर्लिन अहुजा यांच्याबद्दल सांगायचे तर, त्या एक सुप्रसिद्ध बिझनेसवुमन होत्या. मर्लिन यांच्या पश्चात मुलगी तान्या देओलसह दोन मुलंही होते. त्यांचे नाव विक्रम अहुजा आणि मुनिषा अहुजा असे आहे.

Bobby Deol Wife Tanya Deol Mother Marlene Ahuja Dies
Gautami Patil Father Passed Away: नृत्यांगणा गौतमी पाटीलला पितृशोक; वडील रवींद्र पाटील यांचं पुण्यात निधन

बॉबी देओल आणि तान्या देओल यांच्याबद्दल सांगायचे तर, त्यांना आर्यमन आणि धरम देओल अशी दोन मुले आहेत. बॉबी आणि तान्या हे बॉलिवूडच्या क्यूट कपलपैकी एक आहेत. बॉबी देओल शेवटचा ‘आश्रम’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यासोबतच बॉबी देओल येत्या आगामी दिवसात, रणवीर सिंगसोबत ‘पशु’ या चित्रपटात दिसणार आहे. तर बॉबी देओलचा ‘हरी हरा वीरा मल्लू’ हा तेलुगू चित्रपट सुद्धा चर्चेत आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com