Famous Singer Divorce News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Singer Divorce News : लग्नाच्या अवघ्या 4 वर्षातच प्रसिद्ध गायिकेने घेतला घटस्फोट, सोशल मीडिया पोस्टमधून सांगितलं खरं कारण

Kanika Kapoor Announces Sepration: प्रसिद्ध सिंगर कनिका कपूरने पतीसोबत घटस्फोट घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Manasvi Choudhary

लग्नाच्या ४ वर्षानंतर प्रसिद्ध सिंगर कनिका कपूरने पती गौतम हाथीरमानीसोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. कनिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.

'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्यांदा घटस्फोट घेतला आहे. कनिकाने स्वत: इन्स्टाग्रामवर या संदर्भातली पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिने' 'खूप विचार करून आम्ही हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. दोघांनीही सामंजस्यपणे हा निर्णय घेतला असून आमच्या खाजगी आयुष्याचा आदर करावा, 'अशी विनंती तिने केली आहे.

कोण आहेत गौतम हाथीरमानी?

गौतम हाथीरमानी हे प्रसिद्ध बिझनेसमॅन आहेत. लंडन येथे त्याचा बिझनेस आहे. साधारण १५ वर्षांच्या मैत्रीनंतर कनिका आणि गौतम यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२२ मध्ये कनिका आणि गौतम यांचा विवाह काही जवळच्या नातेवाईकांमध्ये लंडनमध्ये पार पडला.

मागील अनेक दिवसांपासून कनिका आणि गौतम यांच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर सुरू होत्या. या अफवांना पूर्णविराम देत प्रसिद्ध गायिका कनिकाने स्वत:च पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती दिली. दोघांनीही अत्यंत विचार विनिमय करून सामंजस्यपणे निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना पक्ष अन् चिन्ह कोणाचं? शिंदेंच्या वकीलाच्या युक्तिवादाने मोठा ट्विस्ट; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Maharashtra News Live Update: पुणे-बेंगळुरू महामार्ग ३० तासापासून ठप्प

Good News: मोठी बातमी! ८ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट, महागाई भत्ता ५३ टक्क्यांनी वाढला; किती रुपये मिळणार?

Chanakya Niti : या ५ गोष्टींवर कधीही पैसे खर्च करू नका! चाणक्यांनी सांगितलं श्रीमंत होण्याचं गुपित

राज्य सरकारचा मोठा निर्णय; एकाचवेळी 1440 MBBS, विशेषज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, काय म्हणाले शिंदे? VIDEO

SCROLL FOR NEXT