Famous Singer Death  saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Singer Death : संगीत क्षेत्रातला अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Singer Passes Away : संगीतविश्वाला मोठा धक्का बसला. ज्येष्ठ गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Shreya Maskar

ज्येष्ठ गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

संगीत विश्वावर शोककळा

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

संगीत विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायकाचे निधन झाले. प्रसिद्ध गायक आणि अभिनेते चंद्रकांत लिमये यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंडित चंद्रकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गायक गुवाहाटीला गेले होते, तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. चंद्रकांत लिमये यांच्या पार्थिवावर मुंबईत १ जून २०२६ ला अंत्यसंस्कार करण्यात येईल.

चंद्रकांत लिमये यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी झाला होता. ज्येष्ठ गायकाने लहानपणापासूनच पं. नारायणराव व्यास, पं. वसंतराव राजोपाध्ये, पं. गजाननबुवा जोशी, पं. रत्नाकर पै, पं. चंद्रशेखर रेळे आणि पं. बाळकराम अशा गुरुंकडे गाण्याचे शिक्षण घेतले. चंद्रकांत लिमये हे ज्येष्ठ गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे शिष्य होते. अभिनेत्याने 'कट्यार काळजात घुसली' या नाटकात खाँ साहेबांची भूमिका साकारली होती. तसेच ते 'संगीत संशयकल्लोळ' नाटकातही झळकले.

ज्येष्ठ अभिनेत्याने 'संत गोरा कुंभार', 'संगीत सौभद्र', 'तो मी नव्हेच', 'पती गेले ग काठेवाडी' या नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांनी २००० मध्ये वसंतराव देशपांडे संगीत सभा या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. याअंतर्गत 'होरी के रंग', 'श्रुतीरंग वर्षा के', 'नाट्यरंग संगीताचे', 'हवेली संगीत' असे कार्यक्रम केले.चंद्रकांत लिमये यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि मुलं आहेत.

ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत लिमये यांच्या निधनाने संगीत आणि मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच गायकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गायकाच्या निधनानंतर प्रेक्षक, चाहते आणि कलाकार मंडळींनी त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे. चंद्रकांत लिमये हे उत्तम गायक आणि अभिनेते होते. आपल्या गोड आवाजाने आणि भन्नाट अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, ५ मिनिटांच्या पावसात हिंजवडीतील रस्ते जलमय, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT