Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Actress Lost Control In Kissing Scenes : प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीने शूटिंग दरम्यानचा एक किस्सा सांगितला. डायरेक्टरने कट म्हटले, तरी अभिनेत्री किसिंग सीन देत राहिली. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Actress Lost Control In Kissing Scenes
Famous Actresssaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला शूटिंगचा किस्सा

डायरेक्टरने कट म्हटले तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्रीने अनेक लोकप्रिय टिव्ही शो आणि बेव सीरिजमध्ये काम केले आहे.

टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा वडोलीयाने शूटिंगचा एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. तिने अनेक मालिका, टिव्ही शो, रिॲलिटी शोमध्ये काम केले आहे. ती लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये देखील झळकली आहे. अभिनेत्रीने एका इंटिमेट सीनचे शूटिंग करताना तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला आहे.

सुनो इंडिया पॉडकास्टमध्ये नेहा वडोलीयाने सांगितले की, "मी एका बेव सीरिजचे शूटिंग करत होते. मी ज्या अभिनेत्यासोबत काम करत होते तो खूप चांगला होता. मी अभिनेत्यासोबत एका रुममध्ये किसिंग सीन शूट करत होते. मॉनिटर खोलीच्या बाहेर होता. दिग्दर्शक बाहेरून मायक्रोफोनमधून बोलत होते. मला त्यांचा थांबण्याचा इशारा ऐकू आला नाही आणि 'कट' म्हटल्यानंतरही मी अभिनेत्याला किस करत राहिले. त्यानंतर मला अभिनेत्याने सांगितले की सीन कट झाला आहे... मला त्या क्षणी खूपच लाज वाटली..."

नेहा वडोलीयाही अभिनेत्रीसोबतच इंटिमेसी कॉर्डिनेटरही आहे. चित्रपट, मालिका, वेब सीरिज यांमध्ये इंटिमेट सीन शूट करताना नेहल कलाकार, क्रू मेंबर्स आणि दिग्दर्शकाना मार्गदर्शन करते. मुलाखतीत आपल्या कामाबद्दल नेहा म्हणाली की, "जेव्हा एखाद्या चित्रपट, वेब सीरिज किंवा टीव्ही सीरिजमध्ये इंटिमेट सीन्स असतो तेव्हा इंटिमेसी कॉर्डिनेटरची गरज असते. कलाकारांना चांगले वाटावे म्हणून इंटिमेसी कॉर्डिनेटर असतो. वेब सीरिजमधील इंटिमेट सीन्स आम्ही लिहित नाही. ते दिग्दर्शक कथेनुसार लिहितात. तो सीन स्क्रिप्टमध्ये तयार केला जातो..."

नेहा पुढे म्हणाली, "खऱ्या आयुष्यात गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा पती-पत्नीमधील रोमान्स सेटवर घडत नाही, कारण या नात्यांमध्ये भावना गुंतलेल्या असतात. खरी जोडपी एकमेकांच्या प्रेमात असतात. म्हणूनच ते जवळीक साधतात. त्याला वेळेची मर्यादा नसते. पण हे सीन्स कथेसाठी केले जातात. तिथे कुठे थांबायचे हे तुम्हाला माहीत असते. कलाकार त्यांच्या इच्छेनुसार कमी-जास्त जवळीकीची दृश्ये करू शकत नाहीत. ते दृश्य कथेनुसारच करावे लागते..."

Actress Lost Control In Kissing Scenes
Deool Band 2 Collection : स्वामींची भक्ती अपरंपार! वीकेंडला 'देऊळ बंद 2' हाऊसफुल, बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा डंका; छप्परफाड कमाईचा आकडा किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com