पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रात मोठी दुर्घटना घडली. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर हजारो टन कचरा अचानक कोसळल्याने दुमजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत २३ कर्मचारी अडकल्याची माहिती समोर आली होती. यातील ८ जणांचा मृत्यू झालाय. ३ दिवसांनंतर त्यापैकी ८ जणांचे मृतदेह प्रशासनाच्या हाती आले आहेत. तर अजून एकाचा शोध सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिलीय.
कोसळलेल्या कचऱ्याच्या डोंगराकडे डोळे लावून बसलेल्या नातेवाइकांना आपल्या घरातील व्यक्ती सुखरूप बाहेर येईल, ही आस होती. त्या आशेवर ९ जणांचे कुटुंबीय आपल्या माणसाची वाट बघत होते. अखेर त्या नऊ जणांचे मृतदेहच या कुटुंबियांच्या हाती आले. त्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तब्बल ८० तासांच्या प्रयत्नानंतर प्रशासनाने या बचाव मोहिमेतून ८ जणांचे मृतदेह बाहेर काढले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.