Famous Actor Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actor Passes Away : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. अभिनेत्याच्या कारकीर्दीबाबत जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले.

अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अभिनेत्याने वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

सिनेसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. 'Coronation Street' या ड्रामामध्ये 'डेव्हिड बार्लो' ही भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते ॲलन रॉथवेल (Alan Rothwell) यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने वयाच्या ८९ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ॲलन रॉथवेल हे मनोरंजन विश्वातील मोठे नाव आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वातील तेजस्वी तारा हरपला.

प्रेस असोसिएशनच्या वृत्तानुसार, अभिनेते ॲलन रॉथवेल यांचे निधन १४ मे रोजी अल्पशा आजाराने झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. अभिनेते रुग्णालयात दाखल दाखल होते. अभिनेत्याच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे. ॲलन रॉथवेल हे टिव्ही विश्वातील मोठे नाव आहे.

ॲलन रॉथवेल कोण?

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेते ॲलन रॉथवेल यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९३७ रोजी इंग्लंडमधील लँकेशायर येथील ओल्डहॅम येथे झाला होता. 'Coronation Street' आणि 'The Archers' या ड्रामामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी इतर अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. १९८० च्या दशकात, त्यांनी 'Brookside' या टीव्ही मालिकेतही काम केले होते, ज्यामध्ये त्यांनी 'निकोलस ब्लॅक' ही भूमिका साकारली होती. 'Picture Box' आणि 'Hickory House' हे त्यांच्या इतर काही लोकप्रिय कामांपैकी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toxic: यशच्या 'टॉक्सिक'ला बकवास म्हणणं प्रसिद्ध यूट्यूबरला पडलं महागात; थेट मिळाली कायदेशीर नोटीस

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

SCROLL FOR NEXT