

दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह पाच व्यक्तिमत्त्वांची पद्मविभूषणसाठी निवड करण्यात आली आहे. यावर्षी एकूण १३१ व्यक्तिमत्त्वांना सन्मानित केले जाणार आहे. त्यापैकी १३ जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जाईल.
पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. हे तीन श्रेणींमध्ये दिले जातात. यात पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री चा समावेश आहे. हे पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासह विविध क्षेत्रांमध्ये/उपक्रमांमध्ये दिले जातात.
पद्म विभूषण : चांगली आणि विशेष सेवा देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
पद्म भूषण: चांगल्या कामासाठी
पद्मश्री : कोणत्याही क्षेत्रातील विशेष सेवेसाठी ते दिले जाते.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात. हे पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींकडून दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात प्रदान केले जातात. २०२६ सालासाठी एकूण १३१ जणांना पद्म पुरस्कार दिले जाणार आहेत. या यादीत ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिला आहेत. या यादीमध्ये परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय श्रेणीतील ६ जण आणि मरणोत्तर १६ जणांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.