Ramen Barua Missing  Saam tv
मनोरंजन बातम्या

Ramen Baruah Missing : प्रसिद्ध गायक २ दिवसांपासून बेपत्ता, फोनही बंद; मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले तपासाचे आदेश

Vishal Gangurde

गुवाहाटी : मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक घटना घडली आहे. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत कुटुंबियांना प्रसिद्ध गायक कुठेच सापडले नाहीत. प्रसिद्ध गायक बेपत्ता झाल्यानंतर मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गायकाच्या मुलीने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. प्रसिद्ध गायकाचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट पोलीस आयुक्तांना शोधण्यासाठी सूचना केल्या आहेत.

कुटुंबियांकडून पोलिसांत तक्रार नोंद

गेल्या दोन दिवसांपासून आसामचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार रामेन बरुआ बेपत्ता झाले आहेत. ते सोमवारपासून घरी परतले नाहीत. सोमवारी सकाळी बरुआ हे घराजवळी मंदिरात दर्शन घ्यायला घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले. ८४ वर्षीय गायक रामेन बरुआ घरी न परतल्याने त्यांच्या कटुंबियांनी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी पोलिसांना ८४ वर्षीय रामेन यांना शोधण्याचे आदेश दिले आहेत.

गायकाचं शेवटचं लोकशन सापडलं

मुख्यंमंत्र्यांच्या आदेशानंतर आसाम पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. पोलीस तपासादरम्यान त्यांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज हाती आलं. या फुटेजमध्ये गायक गुवाहाटी हायकोर्टाजवळील ब्रह्मपुत्र नदीजवळून जाताना दिसत आहेत. त्यांचा फोन देखील बंद आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे. त्यांच्या हातात एक प्लॅस्टिकची बॅग होती. ती बॅग घेऊन कुठेतरी जाताना दिसत आहेत.

दरम्यान, त्यांचं शेवटचं लोकेशन हायकोर्टाच्या इमारतीजवळ आढळलं. मंदिरात जाण्यापूर्वी त्यांचं कुटुंबातील सदस्यांशी भांडण झालं होतं. किराणाच्या खरेदीवरून गायक आणि मुलीमध्ये भांडण झालं होतं. त्यानंतर मंदिराच्या दिशेने निघाले. त्यानंतर ते घरी परतले नाही. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर शोध घेण्याचे आदेश दिले आहेत .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सुभाष देशमुख यांना आणखी एक राजकीय धक्का

NPS Vatsalya Yojana: वर्षाला १००० रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा; केंद्र सरकारची नवी योजना नक्की आहे तरी काय?

Himesh Reshammiya Father Died : गायक हिमेश रेशमियाला पितृशोक, 87 वर्षी वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Politics: लोकसभेला फटका, विधानसभेला सावध पवित्रा! शिंदे गटाचा उत्तर भारतीयांवर डोळा; मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवा प्लॅन

How to Handle Saree in Dancing? : साडी नेसून मिरवणुकीत डान्स कसा करायचा? करिष्माने थेट नाचून दाखवलं, VIDEO

SCROLL FOR NEXT