संजय सूर्यवंशी, साम टीव्ही, नांदेड प्रतिनिधी
नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे हदगाव तालुक्यातील पेवा या गावातील पोलीस पाटलाने आज ग्राम पंचायतीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओही शूट केला आहे. त्यात हदगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला.
बालाजी जाधव, असं आत्महत्या केलेल्या पेवा येथील पोलीस पाटलांचं नाव आहे. माझ्या मृत्यूला पोलीस उपनिरीक्षक बडीकर जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडीओत केला आहे.
आत्महत्येपूर्वी शूट केलेल्या व्हिडिओत ते म्हणाले आहेत की, ''बडीकर यांनी माझ्यावर अन्याय करायला नको होता. मी त्या घटनेची माहिती देऊनही माहिती लपवली, असा रिपोर्ट त्यांनी केला, असं मयत बालाजी जाधव व्हिडीओत म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 दिवसापूर्वी पेवा या गावात एकाचा खून झाला होता. जातीयवादातून खून झाल्याचे सांगण्यात येते. याच घटनेतील आरोपीबद्दल पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी माहिती लपवली, असा पोलिसाचा समज होता. त्यातून पोलीस उपनिरिक्षक बडीकर यांनी बालाजी जाधव यांना विचारना केली होती.
पण आपल्यावर खोटा आरोप होत असल्याने त्यांनी आत्महत्या केली, असा आरोप आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणला होता. आता याप्रकरणी पुढे काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.