मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
लोकप्रिय अभिनेत्रीने लग्नाच्या 16 वर्षांनी घटस्फोट घेतला आहे.
घटस्फोटानंतर अभिनेत्रीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
लोकप्रिय अभिनेत्री , मॉडेल हिने लग्नाच्या 16 वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे श्रीनंदा शंकर. श्रीनंदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती एक इन्फ्लुएन्सर देखील आहे. श्रीनंदा शंकरच्या नवऱ्याचे नाव गेव सत्तारवाला (Gev Satarawalla) असे आहे. श्रीनंदा आणि गेवने लग्नाच्या 16 वर्षांनी घटस्फोट घेतला आहे.
अभिनेत्री श्रीनंदाने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. "गेव आणि मी अधिकृतपणे वेगळे झालो आहोत..." असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. घटस्फोटानंतर आम्ही चांगले आणि शांत आयुष्य जगत असल्याचे तिने सांगितले. तसेच त्यांच्या गोपनीयतेचा आदर ठेवण्याची विनंती तिने केली आहे. त्यानंतर श्रीनंदाने एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. श्रीनंदाच्या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहे. तसेच तिला पाठिंबा देत आहेत.
गेव आणि श्रीनंदा यांचे लव्ह मॅरेज होते. दोघे पहिल्यांदा सोशल मीडियावर भेटले. 8 महिने दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे तब्बल 5 वर्ष लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. 2009 मध्ये गेव आणि श्रीनंदा यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर दोघांनी आता 2025 मध्ये म्हणजे तब्बल 16 वर्षांनी आपले नाते संपवले.
श्रीनंदा शंकर ही अभिनेत्री , मॉडेल, डान्सर, इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आहे. श्रीनांदा शंकर प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना आणि कोरिओग्राफर तनुश्री शंकर आणि संगीतकार आनंद शंकर यांची लेक आहे. श्रीनंदाला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तसेच तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.