मुलीने लव्ह मॅरेज केल्याने बाप संतापला; जावयाच्या भावाला हात-पाय बांधून जिवंत जाळलं

telangana crime news : मुलीने लव्ह मॅरेज केल्याने भडकलेल्या बापाने जावयाच्या भावाला हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
telangana News
telangana crime news Saam tv
Published On
Summary

तेलंगणात प्रेमविवाहावरून संतापलेल्या बापाकडू जावयाच्या भावाची निर्घृण हत्या

पाचहून अधिक लोकांनी केलं जावयाचा भाऊ राजशेखरचे अपहरण

अपहरणानंतर जंगलात जिवंत जाळलं

तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीने प्रेम विवाह केल्याने बापाने जावयाच्या भावाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलीच्या बापाने पाच हून अधिक जणांच्या मदतीने १२ नोव्हेंबर रोजी मुलाच्या भावाचं अपहरण केलं. त्यानतंर जंगलात हात पाय बांधून जिवंत जाळल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील फारुकनगर मंडलच्या एलमपल्लीमध्ये ही घटना घडली आहे. याच भागातील एर्रा मल्लेश यांना चार मुले आणि दोन मुली आहेत. त्यांचा लहान मुलगा चंद्रशेखर याने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर चंद्रशेखर हा रिक्षा चालवत होता. त्याचं गावातील कागु वेंकटेशची १९ वर्षीय मुलगी भवानीसोबत प्रेमसंबंध होते. भवानी पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. दोघे वेगवेगळ्या जातीचे होते. दोघांच्या प्रेमसंबंधावरून त्यांच्या कुटुंबात वारंवार भांडणे व्हायचे.

telangana News
Mahaharashtra Politics : एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन शिलेदारांचा भाजपमध्ये प्रवेश

कुटुंबाच्या भांडणामुळे दोघे जोडप्याने पोलिसांत तक्रार दिली होती. त्याचवेळी दुसरीकडे वडील वेंकटेशन यांनी थेट मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. यानंतर दोन्ही कुटुंबांना पोलीस स्टेशनला बोलावून समज दिली. त्या दिवशी पोलिसांनी दोन्ही जोडप्याला घरी सोडलं होतं. गावातील पंचायतनेही तरुणाला तरुणीपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता.

ग्राम पंचायतच्या इशाऱ्यानंतरही दोघांनी ५ नोव्हेंबर रोजी पळून जाऊन लग्न केलं. दोघांचा आंतरजातीय विवाह मुलीचे वडील वेंकटेशन यांना मान्य नव्हता. चंद्रशेखरचा मोठा भाऊ राजशेखर याने दोघांच्या लग्नासाठी मदत केली होती. त्यामुळे वेंकटेशनने पाचहून अधिक लोकांच्या मदतीने राजशेखरच्या हत्येचा कट रचला.

telangana News
Beed Politics : बीडमधील ६ नगरपरिषदेच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट; कुठे असेल महायुती कुठे बिघाडी?

त्या दिवशी काय घडलं?

राजशेखर ड्युटी करून घरी परतत होता. त्याचवेळी त्याला शादनगर येथे अडवून त्याला मारहाण केली. या मारहाणीत राजशेखर बेशुद्ध झाला. या लोकांनी बेशुद्ध झालेल्या राजशेखरचे हात पाय बांधले. त्यानंतर जंगल परिसरात नेलं. त्यानंतर राजशेखरवर पेट्रोल ओतून जाळून टाकलं.

telangana News
Aadhar card : आधार कार्डावरील नाव किती वेळा बदलू शकतो? ९० टक्के लोकांना उत्तर माहीत नाही

राजशेखर घरी न परतल्याने त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी एका शेतकऱ्याच्या शेतात एकाचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदनाच्या अहवालात मृत व्यक्ती राजशेखर असल्याचे समोर आले. राजशेखरची हत्या झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com