Actor Sachin Pilgaokar Shared Chandrayaan 3 Meme's From Banava Banvi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chandrayaan 3 Meme's: चंद्रावर विराजमान झालेला पहिला भारतीय; ‘चांद्रयान ३’ निमित्त अभिनेता सचिन पिळगावकरांनी करून दिली बनवाबनवीची आठवण

Chetan Bodke

Actor Sachin Pilgaokar Shared Chandrayaan 3 Meme's From Banava Banvi

२३ ऑगस्ट २०२३ हा दिवस अवघ्या भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस होता. या दिवशी संपूर्ण भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. काल सायंकाळी ‘चांद्रयान ३’चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यशस्वीरीत्या चंद्रावर उतरले आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच एका देशाचे यान उतरल्यामुळे, इस्रोने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीने अवघ्या जगाचे लक्ष वेधले. सध्या सोशल मीडियावर ‘चांद्रयान ३’ची जोरदार चर्चा सुरू आहे.

‘चांद्रयान ३’बद्दलचे सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल होत आहे. अशातच एका मीम्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची बरीच चर्चा सर्वत्र होत आहे.

भारताचे ‘चांद्रयान ३’ चंद्रावर पोहचले आणि सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली. नेटकऱ्यांच्या या यशाची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा होत आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’मधील एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकरांनी काही वेळेपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे बाईच्या रूपात चंद्रावर बसलेले दिसून येत आहे. यावेळी पोस्ट शेअर करताना त्यांनी “चंद्रावर विराजमान झालेला पहिला भारतीय” अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. (Viral Video)

सध्या सचिन पिळगांवकरांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. दरम्यान, हा किस्सा ‘अशी ही बनवाबनवी’मधला असून या चित्रपटाची कायमच चर्चा होत असते. ‘अशी ही बनवाबनवी’ मधला हा सीन तुम्हा सर्वांच्या लक्षात असेल. एव्हरग्रीन गाणे ‘कुणी तरी येणार येणार गं’ मधील गाण्यामध्ये लक्ष्मीकांत यांचा चंद्रावर बसलेला हा फोटो आहे. लक्ष्मीकांत यावेळी गरोदर असल्याचे दाखविण्यात आहे आणि त्याचे डोहाळ जेवणावर हे गाणे आधारित आहे.

दरम्यान हा चित्रपट पाहताना, हसून हसून तुमचा जबडा दुखेल पण विनोद काही थांबणार नाही. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सिद्धार्थ रे, निवेदिता सराफ, सु्प्रिया पिळगांवकर, प्रिया बेर्डे, आश्विनी भावे या दमदार कलाकारांची स्टार कास्ट चित्रपटात मुख्य भूमिकेत होती.

सचिन यांची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांना, लक्ष्याची पुन्हा एकदा आठवण झाली आहे. सचिन पिळगांवकरांच्या पोस्टवर युजर म्हणतात, अविस्मरणीय अभिनेता... लक्ष्मीकांत जी, तर आणखी एकाने चंद्रावरील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणून लक्ष्मीकांत बेर्डेंचं नाव घेतलंय, तर अनेकांनी लक्ष्मीकांत बेर्डेंनी साकारलेल्या पार्वतीच्या पात्राचे देखील तोंडभरून कौतुक केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT