Fact Check saam tv
मनोरंजन बातम्या

Fact Check: थलापती विजय खरंच जंतर-मंतरवर पोहोचले? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर

Did Vijay visit Jantar Mantar? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात अभिनेते विजय दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं सत्य काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अनेक मनोरंजन विश्वातील कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा

विजय दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्याचा दावा

विजय यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल

जगभरातून सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील सोनम वांगचुक यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला आहे. अशात आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, अभिनेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आले आहेत. व्हिडीओत विजय मोठ्या गर्दीतून फिरताना दिसत आहे तर पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी त्याला गर्दीतून घेऊन जात आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @_Attitude_Vini या यूजर आईडीवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "थलपथी विजय दिल्लीच्या जंतर मंतरवर पोहोचले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला का? खरंच?"

या दाव्याची नंतर दिल्ली पोलिसांनी दखल घेतली, ज्याने ऑनलाइन प्रसारित होणारी माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले. पोलीसांनी लिहिलं की, "ही माहिती असत्य आहे. प्रसारित केला जाणारा व्हिडिओ नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथील नाही. कृपया असत्य किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका @_Attitude_Vini"

आगामी प्रोजेक्ट

विजय यांचा आगामी चित्रपट 'जना नायगन' ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एच. विनोथ दिग्दर्शित या चित्रपटात अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिलेले आहे. 'जना नायगन' हा चित्रपट 23 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'जना नायगन'ला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून 'ए' प्रमाणपत्र मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT