Priyanka Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

देसी गर्ल प्रियांका चोप्रानं हॉलिवूडचा प्रवास सांगतानाच व्यक्त केली 'ही' इच्छा!

गेल्या दशकभरात हॉलिवूडमध्ये काम केल्यानंतरही प्रियांकाला ती नवीन असल्याचे वाटते आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : विश्वसुंदरी प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. प्रियांकाने बॉलिवूडसह(Bollywood) हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिनेमाविश्वात प्रियांकाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दशकभरात हॉलिवूडमध्ये काम केल्यानंतरही प्रियांकाला ती नवीन असल्याचे वाटते आहे. अलीकडेच एका मुलाखतीत प्रियाकांने तिचा अनुभव शेअर करत तिच्या प्रवासाविषयी सांगितले आहे.

प्रियांकाने मुलाखतीदरम्यान, "मला माझे ध्येय साध्य करायचे आहे, ज्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असते. मला माझे ध्येय आत्मसात करून नवीन सुरूवात करायची आहे. एखाद्या विषयीचा सखोल अभ्यास करणे, काही ना काही नवीन शिकण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते. मला ते आवडतं. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घेता त्यावेळेस तुम्ही ती साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असता, असे तिने म्हटलं.

मला माझे ध्येय साध्य करायचे आहे. आणि जर मी तो माझा विक्रम मोडला तर एक भारतीय अभिनेत्री म्हणून माझी जी सिनेमाविश्वातील कारकीर्द आहे ती उत्तमपणे यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मी अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले आहे. मी असे काही चित्रपट केले आहेत ज्यांचा मला खरोखर अभिमान आहे. आता मला इग्रंजी भाषेतील चित्रपटांत काम करायचे आहे, अशी इच्छा तिने बोलून दाखवली.

प्रियाकांने १० वर्षे अमेरिकेत प्रचंड मेहनत केल्यानंतर हॉलिवूडमधील आपला प्रवास सुरू केला. ती म्हणाली “एक अभिनेत्री म्हणून हॉलिवूडमध्ये अद्यापही मी नवीन आहे. १० वर्षे येथे काम केल्यानंतर, मी अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे मी अनेक भूमिका साकारल्या आहेत.

प्रियांकाने अमेरिकन टीव्ही शो क्वांटिकोमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यात प्रियांकाने अॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारली होती. तेव्हापासून तिचा हा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. प्रियांकाने 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन', 'बेवॉच' आणि 'इ इट रोमँटिक' सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या प्रियांका हॉलिवूड सिटाडेलचं शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय दोन हॉलिवूड चित्रपटांमध्येही ती झळकणार आहे. रोमँटिक कॉमेडी आधारित इट्स ऑल कमिंग बॅक टू मी आणि एडिंग थींग्स अशी चित्रपटाची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT