Awarapan 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Awarapan 2 : "इस बार या तो यह 'आवारापन' खत्म होगा या मैं..."; तब्बल १९ वर्षांनी शिवम परतला, इमरान हाश्मी पुन्हा गाजवणार बॉलिवूड

Awarapan 2 Teaser : बॉलिवूडचा सुपरस्टार इमरान हाश्मीच्या 'आवारापन २' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. इमरान हाश्मी टीझरमध्ये हटके अंदाजात दिसत आहे. चित्रपटाची रिलीज डेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'आवारापन २' चित्रपट ॲक्शन-रोमँटिक थ्रिलर ड्रामा आहे

'आवारापन २' मध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत

१९ वर्षांनी शिवम पंडित परत आलाय

"अक्खा बॉलिवूड एक तरफ और इमरान हाश्मी एक तरफ..." अभिनेता इमरान हाश्मी पुन्हा एकदा थिएटर गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच 'आवारापन २' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. ज्यात इमरान हाश्मीचा लूक पाहून थरकाप उडेल. 'आवारापन २' हा ॲक्शन-रोमँटिक थ्रिलर ड्रामा आहे. चित्रपट नितीन कक्कर दिग्दर्शित आहे. तर सिनेमाची निर्मिती विशेष भट्ट यांनी केली आहे. 'आवारापन २' मध्ये इमरान हाश्मी शिवम पंडितच्या भूमिकेत दिसणार आहे.

टीझरमध्ये नेमकं काय?

'आवारापन २'च्या टीझरमध्ये प्रेम, दुःख आणि अॅक्शन यांचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. टीझरमधील डायलॉग लयभारी आहेत. टीझरमध्ये इमरान बाईक चालवताना दिसतोय. टीझर एका आकर्षक संवादाने सुरू होतो, ज्यात इमरान हाश्मी म्हणतो की, "कुछ लोगों की कहानियां उनकी मर्जी से खत्म नहीं होती, उनकी कहानी दूसरे लोगों के लिए लिखी जाती है..."

टीझरमध्ये पुढे इमरान, आलिया हमीदच्या (आवारपनमध्ये श्रिया सरनने साकारलेली भूमिका) कबरीजवळ बसलेला दिसतो. 'आवारपन' जिथे संपला, तिथूनच 'आवारापन २'ची कथा सुरू होताना दिसत आहे. टीझरमध्ये इमरानचे जबरदस्त डायलॉग ऐकायला मिळत आहे. तो बोलतो की, "मौत भी अजीब है, उसने मुझे छुआ पर अपनाया नहीं..." दिशा पटानी देखील टीझरमध्ये दिसत आहे.

'आवारापन २' मध्ये चित्रपटात दिशा पटानी इम्रानच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचीही एक झलक पाहायला मिळते. त्या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारणार आहेत.टीझरमध्ये 'आवारपन'मधील 'तो फिर आओ' हे गाजलेले गाणे नवीन रुपात पाहायला मिळणार आहे. टीझरच्या शेवटी शिवम पंडित म्हणतो की, "इस बार या तो यह आवारापन ख़त्म होगा या मैं।"

'आवारापन २' रिलीज डेट

टीझरच्या कॅप्शनला लिहिलं की, "१९ वर्षांची प्रतीक्षा आता संपली... शिवम परत आलाय...तुम्ही त्याची कथा जिवंत ठेवलीत; आता ती कथा पुढे नेण्यासाठी तो परतलाय..." 'आवारापन २' चित्रपट 14 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT