Mouni Roy: दिशा पटानी अन् मौनी रॉय रिलेशनशिपमध्ये होते? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

Mouni Roy: मौनी रॉयने सूरज नांबियारसोबतच्या घटस्फोटानंतर आणि तिच्या लैंगिकतेबाबत पसरलेल्या अफवांवर पहिल्यांदाच भाष्य केले. ट्रोलर्सना तिने दिले स्पष्ट आणि सडेतोड उत्तर.
Mouni Roy
Mouni RoySaam tv
Published On

Mouni Roy: बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती सूरज नांबियारसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे ती सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे. याच दरम्यान तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेक अफवा पसरल्या, ज्यावर आता मौनीने पहिल्यांदाच स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडेच मोनिका शर्माच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या एका मुलाखतीत मौनी रॉयने तिच्याबद्दल सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर आणि ट्रोलिंगवर भाष्य केले. मुलाखतीदरम्यान तिला तिच्याबाबत पसरलेल्या सर्वात विचित्र अफवेबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना मौनी म्हणाली, 'अरे, ती अफवा की मी गे आहे. पण मला सगळ्यांना सांगायचे आहे की मी गे नाही आहे.'

Mouni Roy
Salman Khan: 'तेरे नाम २.०...';' सलमानचा नवा लूक पाहून आमीर-करिनाला बसला धक्का, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल राधे

गेल्या काही काळात सोशल मीडियावर काही युजर्सनी मौनीचे नाव अभिनेत्री दिशा पटानीशी जोडले होते. यानंतर तिच्या लैंगिकतेबद्दल विविध प्रकारच्या चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले. मात्र, या सर्व अफवांकडे दुर्लक्ष करत मौनीने यावर हलक्याफुलक्या शैलीत प्रतिक्रिया देत ट्रोलर्सना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले.

Mouni Roy
Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये नको ते बरळणाऱ्या सेजल पवारवर आधी FIR दाखल, आता KEM कॉलेजकडून मोठी कारवाई

यावेळी मौनीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळाबद्दलही मोकळेपणाने संवाद साधला. सूरज नांबियारपासून वेगळे झाल्यानंतर तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागल्याचे तिने सांगितले. मौनी म्हणाली, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझ्याकडे असे मित्र आणि कुटुंब आहे, जे प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी कठीण प्रसंगांना सामोरे जाऊ शकले.”

तिने विशेषतः तिच्या मैत्रिणींचे कौतुक करत सांगितले की, “चांगला काळ असो किंवा वाईट, माझ्या मैत्रिणी नेहमी माझ्यासोबत खंबीरपणे सोबत राहिल्या आहेत. आयुष्यात अशा मजबूत आणि प्रेरणादायी स्त्रिया असणे खूप महत्त्वाचे असते. त्या तुम्हाला पुढे जाण्याची ताकद देतात. माझ्या मैत्रिणी खरोखरच बेस्ट आहेत.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com