Emraan Hashmi : इमरान हाश्मी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी; पोटातले टिश्यू फाटले, नेमकं घडलं काय?

Emraan Hashmi Injured : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शूटिंगदरम्यान अभिनेता गंभीर जखमी झाला. नेमकं घडलं काय, सविस्तर जाणून घेऊयात.
Emraan Hashmi Injured
Emraan Hashmisaam tv
Published On
Summary

अभिनेता इमरान हाश्मी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर अभिनेत्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

ॲक्शन सीन शूट करताना हा मोठा अपघात घडला.

बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता इम्रान हाश्मीचा मोठा अपघात झाला आहे. इम्रान हाश्मी सध्या 'आवारापन 2'चे शूटिंग करत होता. शूटिंग दरम्यान एक ॲक्शन सीन करताना त्याला मोठी दुखापत झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. इम्रान हाश्मीला नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

'आवारापन 2' चित्रपटाचा ॲक्शन सीन शूट करताना इम्रान हाश्मीच्या (Emraan Hashmi ) पोटाला लागले आणि पोटातील टिश्यू फुटले. इम्रान हाश्मीला लागताच त्वरित रुग्णालय दाखल करण्यात आले. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेनंतरही, इमरान हाश्मीने चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले नाही आणि आता तो चित्रपटाच्या सेटवर परतला आहे. इम्रान हाश्मी ठीक झाल्यावर चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. सध्या इम्रान राजस्थानमध्ये शूट करत आहे. चित्रपटातील त्याचे ॲक्शन सीन आता कमी करण्यात आले आहे.

इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2' चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 'आवारापन 2' चित्रपट 3 एप्रिल 2026 ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'आवारापन 2' हा 2007 साली रिलीज झालेल्या 'आवारापन' चित्रपटाचा सीक्वल आहे. 'आवारापन 2'मध्ये इम्रान हाश्मी शिवमच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिशा पटानी, शबाना आझमी हे कलाकार झळकणार असल्याचे बोले जात आहे. 'आवारापन 2'चे दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले आहे.

अलिकडेच 7 नोव्हेंबर 2025ला इम्रान हाश्मीचा 'हक' चित्रपट रिलीज झाला. हा एक कोर्टरूम ड्रामा असून यात तो यामी गौतमसोबत दिसला. 14 जानेवारी 2026 मध्ये इमरान हाश्मीचा नवा प्रोजेक्ट 'तस्करी: द स्मगलर्स वेब' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'हक' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. चाहते आता 'आवारापन 2'ची वाट पाहत आहेत.

Emraan Hashmi Injured
Famous Actor Death : मनोरंजनसृष्टीवर शोककळा; सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, 200 हून अधिक चित्रपटात केलंय काम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com