Emraan Hashmi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Emraan Hashmi : इमरान हाश्मीला डबल लॉटरी! 'आवारापन २' चित्रपट १०० कोटींच्या उंबरठ्यावर अन् 'जन्नत ३' येणार? निर्मात्यांनी दिली हिंट

Awarapan 2 Collection - Jannat 3 Announcement : बॉलिवूड स्टार इमरान हाश्मीने अवघ्या जगाला वेड लावले आहे. त्याचा 'आवारापन २' तुफान गाजत आहे. चित्रपटाची कमाई किती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉक्स ऑफिसवर इमरान हाश्मीची क्रेझ

'आवारापन २' चित्रपट १०० कोटींच्या उंबरठ्यावर

'जन्नत ३' बद्दल निर्मात्यांनी मोठी हिंट दिली

बॉक्स ऑफिसवर सध्या इमरान हाश्मीची हवा पाहायला मिळत आहे. 'आवारापन २' ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. चित्रपटाची गाणी सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहेत. 'आवारापन २' चित्रपट १४ ऑगस्टला रिलीज झाला आहे. चार दिवसांत चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. 'आवारापन २' मध्ये इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत दिशा पटानी झळकली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले आहे.

'आवारापन २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'आवारापन २' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी २२ कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी त्याच्या कमाईत सुमारे ५५ टक्क्यांनी वाढ होऊन चित्रपटाने ३३.७५ कोटी रुपये कमावले. चित्रपटाने पहिल्या रविवारी २६ कोटी रुपये कमावले. तर चित्रपटाने सोमवारी ९.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'आवारापन २' ची भारतातील एकूण नेट कमाई ९१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 'आवारापन २' ने जगभरात अंदाजे १३०.८२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

  • दिवस १ - २२.०० कोटी रुपये

  • दिवस २ - ३३.७५ कोटी रुपये

  • दिवस ३ - २६.०० कोटी रुपये

  • दिवस ४ - ९.२५ कोटी रुपये

  • एकूण - ९१ कोटी रुपये

'आवारापन २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 'बटवारा १९४७' लाही मागे टाकले आहे. 'आवारापन २' आता लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'आवारापन २'ची निर्मिती ४५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. प्रदर्शनानंतरच्या या सुरुवातीच्या काळातच ९१ कोटी रुपयांची कमाई केल्यामुळे, हा चित्रपट 'हिट' ठरला आहे.

'जन्नत ३' येणार?

'आवारपन २' च्या यशानंतर निर्माते विशेष भट्ट यांनी इमरान हाश्मीच्या हिट चित्रपट 'जन्नत'च्या तिसऱ्या भागाची 'जन्नत ३' नावाची घोषणा केली आहे. झूमशी बोलताना विशेष भट्ट म्हणाले की, "'आवारपन'नंतर मी नक्कीच 'जन्नत ३' ची वाट पाहत आहे." पटकथेच्या सद्यस्थितीबद्दल विचारले असता, त्यांनी उत्तर दिले, "त्यावर काम सुरू आहे." विशेष भट्ट यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, त्यांनी 'आवारपन २' प्रदर्शित होण्यापूर्वीच 'जन्नत ३' वर काम सुरू केले होते, त्यामुळे लवकरच 'जन्नत ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही. 'जन्नत'चा पहिला भाग २००८ ला आणि दुसरा भाग २०१२ ला रिलीज झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT