शूटिंग सेटवर भयंकर अपघात
हवेत पलटी झाली SUV कार
बॉलिवूडच्या अभिनेताचा अपघात झाल्याची रंगली चर्चा
बॉलिवूडचा हिरो इमरान हाश्मी सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'गनमास्टर G9' मुळे चांगलाच चर्चेत आहे. इमरान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशात चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात एक धोकादायक कार स्टंट पाहायला मिळत आहे. हा 'बिहाईंड-द-सीन्स' व्हायरल होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आउटडोअर सेटवर कार स्टंट सुरु आहे. जिथे एका मोठ्या क्रेनच्या साहाय्याने एसयूव्ही हवेत लटकवलेली आहे. क्रेनद्वारे काउंटडाऊन सुरू असताना क्रू सदस्य आणि तिथे उपस्थित लोक रस्त्यावर उभे राहून हे दृश्य पाहत आहेत. काउंटडाऊन 'एक'वर येताच, क्रेनच्या केबल्समुळे हवेत लटकवलेल्या एसयूव्हीला अचानक झटका बसतो आणि ती हवेतच उलटते. ती गाडी खाली झुलत आणि फिरत खाली उभ्या असलेल्या एका काळ्या रंगाच्या व्हॅनच्या छतावर जोरात आदळते. त्यानंतर इतर प्रॉडक्शन वाहने आणि क्रू सदस्य त्या गाडीच्या दिशेने धाव जाताना दिसतात.
मीडिया रिपोर्टनुसार, सुदैवाने, यात कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. गाडीचे हे उलटणे स्टंटचाच एक भाग होता की काहीतरी गडबड झाली, याबद्दल निर्मात्यांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही. मात्र इमरान हाश्मीच्या चाहत्यांना त्याच्या चिंता लागून राहिली आहे, कारण दुसरीकडे असाही दावा केला जात आहे की, स्टंटच्या वेळी इमरान हाश्मी तिथे उपस्थित होता आणि गाडी त्याच्या चेहऱ्यापासून काही इंचांवरून गेली. व्हिडिओमध्ये मात्र इमरान कुठेही दिसत नाही. त्यामुळे, हा स्टंट इम्रानच्या चित्रपटाशी संबंधित आहे, याची पुष्टी करता येत नाही. तसेच, 'गनमास्टर जी९' च्या निर्मात्यांनीही या प्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. व्हायरल व्हिडीओ इमरान हाश्मी, इमरान हाश्मीच्या चित्रपटाचा आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
'गनमास्टर G9' या हिंदी ॲक्शन-रोमान्स-थ्रिलर चित्रपटात इमरान हाश्मी 'ईश्वर'ची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात जेनेलिया देशमुख 'आरती'च्या आणि अपारशक्ती खुराना 'देसू'च्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन सारिम मोमिन आणि जुनैद वासी यांनी केले असून, आदित्य दत्त याचे दिग्दर्शन करत आहेत.'गनमास्टर G9' सध्या २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.