Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ३४व्या वर्षी निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

Famous Actor Passes Away : सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ३४ व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्याच्या कारकीर्दीबद्दल जाणून घेऊयात.
Famous Actor Passes Away
Famous Actor Deathsaam tv
Published On: 
Summary

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

वयाच्या ३४ व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वावर शोककळा

मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे अचानक निधन झाले. 'ब्रेकिंग बॅड' या गाजलेल्या टिव्हीच्या मालिकेत वॉल्टर व्हाईट ज्युनियर उर्फ फ्लिनची भूमिका साकारणारा अभिनेता आर. जे. मिटे (RJ Mitte) याचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

टीएमझेडच्या वृत्तानुसार, काउंटी अधिकाऱ्यांनी सोमवारी टेक्सासमध्ये अभिनेत्याचे निधन झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांच्या मृत्यूची आत्महत्या म्हणून चौकशी केली जात असून, तपास सुरू असल्याची पुष्टी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केली आहे. अभिनेता आर. जे. मिटे याने वयाच्या ३४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मीडिया रिपोर्टनुसार, आर. जे. मिटे एएमसीच्या पुरस्कार विजेत्या 'ब्रेकिंग बॅड' या मालिकेच्या ५६ भागांमध्ये दिसला.अलिकडेच आर. जे. मिटे 'द जो वल्पिस पॉडकास्ट'वर दिसला, जिथे त्याने 'ब्रेकिंग बॅड'ने त्याचे आयुष्य कसे बदलले याबद्दल सांगितले आणि मालिकेचा शेवट होऊन अनेक वर्षे उलटल्यानंतरही सहकलाकारांसोबतच्या त्याच्या नात्यावर चर्चा केली.अभिनेता 'द ओक रूम', 'द रिकॉल' आणि 'द गार्डियन्स ऑफ जस्टिस (विल सेव्ह यू!)' यांसारख्या प्रोजेक्टसाठीही ओळखला जातो.

Famous Actor Passes Away
Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री! सलमान खाननं वीकेंड का वारमध्ये दिलं सरप्राइज, सोशल मीडिया स्टार आहे तरी कोण?

अभिनेता आर. जे. मिटे अभिनयापलीकडे, 'युनायटेड सेरेब्रल पाल्सी' आणि 'श्राइनर्स चिल्ड्रन्स'साठी सदिच्छादूत म्हणून काम केले. त्यांनी 'द मिटे फाऊंडेशन'चे अध्यक्ष म्हणूनही काम केले. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांनी आणि कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com