Famous Actor Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन सृष्टीवर शोककळा

Television Actor Passed Away : प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याचे निधन झाले. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. अभिनेत्याविषयी जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

मनोरंजन विश्वावर शोककळा

अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेते पीटर फैबर (Peter Faber) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे. जगभरातील त्यांचे चाहते आणि सहकलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

e24 च्या वृत्तानुसार, ज्येष्ठ अभिनेते पीटर फैबर हे डच सिनेमा आणि थिएटरमधील सर्वात प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या कलेने चाहत्यांना वेड लावले. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला श्वास घेण्यास गंभीर त्रास आणि हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

१९७० च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या पीटर यांनी 'कितजे टिपल' आणि 'सोल्डात व्हॅन ओरांजे' सारख्या सर्वकालीन क्लासिक चित्रपटांद्वारे मोठी ओळख मिळवली. याशिवाय त्याने रिचर्ड ॲटनबरो यांच्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट 'अ ब्रिज टू फार'मध्ये सीन कॉनरी आणि अँथनी हॉकिन्स सारख्या हॉलिवूड दिग्गजांसह काम केले.पीटर यांनी १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस ॲमस्टरडॅममध्ये एक थिएटर ग्रुपची स्थापना केली, ज्याने सामान्य लोकांच्या भावनांवर आधारित नाटकांमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी, त्याला 'लुईस डी'ओर' हा डच थिएटरचा सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित पुरस्कार दोनदा मिळाला.

रस्त्यावर व्यतीत केलेले बालपण आणि तारुण्य यातून शिकून त्यांनी २००८ मध्ये 'पीटर फॅबर फाउंडेशन' सुरू केले. तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना सर्जनशील दिशेने वळवणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. अभिनेते पीटर शेवटपर्यंत अभिनयात सक्रिय राहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT