Heart Attack - BP : श्रावणात उपवास करताय? हृदयविकार अन् हाय बीपीच्या रुग्णांनी 'ही' घ्या खबरदारी, नाहीतर जीवाचा धोका वाढेल

Shreya Maskar

डॉक्टरांचा सल्ला

उपवास करण्याआधी उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराची समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या. काय खावे, काही नाही सर्व माहित करून घेणे गरजेचे आहे.

Doctor's advice

औषधांचे व्यवस्थापन

उपवासा दरम्यानही औषधांचे व्यवस्थापन करा. वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार वेळा पाळा. जेणेकरून तुमची औषधांची मात्रा चुकणार नाही किंवा तुम्ही रिकाम्या पोटी महत्त्वाच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने घेणार नाही.

Administration of Medicines

पुरेसे पाणी प्या

डिहायड्रेशन टाळण्यासाठी उपवासात पुरेसे पाणी प्या. शरीर हायड्रेट राहणे खूप गरजेचे आहे. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Drink enough water

मीठाचे प्रमाण

उपवास सोडताना, तेलकट, तळलेले किंवा जास्त मीठ असलेले पदार्थ टाळा, ज्यामुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो. हलक्या आहाराचा सेवन करा.

salt

आहार

उपवासादरम्यान ऊर्जा स्थिर ठेवण्यासाठी धान्य, ताजी फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त पदार्थ खा. जास्त ताण घेऊ नका.

diet

अति खाणे टाळा

उपवासानंतर लगेचच अति खाणे किंवा जड जेवण टाळा, कारण त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर आणि हृदय , रक्तवाहिन्यांच्या प्रणालीवर अचानक ताण येतो.

Avoid overeating

शरीराचे संकेत ओळखा

उपवासादरम्यान चक्कर येत असेल, गोंधळल्यासारखे वाटत असेल, खूप थकवा जाणवत असेल किंवा छातीत अस्वस्थता, हृदयाचे ठोके वाढत असतील, तर ताबडतोब उपवास थांबवा.

Recognize body signals

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT : तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढतेय, सुरुवातीची 'ही' लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...