leena manimekalai, twitter trends, trending news saam tv
मनोरंजन बातम्या

Arrest Leena Manimekalai : वादग्रस्त पोस्टरबाबत तक्रार दाखल; दिग्दर्शक लीना मणिमेकलाई अडचणीत

या चित्रपटाच्या पाेस्टरवरुन समाज माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त हाेऊ लागली आहे.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : चित्रपट दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई (Leena Manimekalai) 'सेंगदाल' आणि 'मदाथी' सारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. 'अरेस्ट लीना मणिमेकलाई' (Arrest Leena Manimekalai) हा हॅशटॅग आज ट्विटरवर ट्रेंड हाेऊ लागला. त्यानंतर स्वत: लीना मनिमेगलाई (Leena Manimekalai) हिने ट्विट करीत स्वत:चे मत मांडले आहे. दरम्यान दिल्लीतील एका वकिलांनी आज (सोमवार) दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई यांच्या विरोधात पोलिसात (police) तक्रार दाखल केली. वकील जिंदाल म्हणाले देवी कालीला स्मोकिंग दाखवून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. जे आक्षेपार्ह आहे. ते कोणत्याही प्रकारे स्वीकारले जाऊ शकत नाही. संबंधितांवर तत्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. (Arrest Leena Manimekalai Latest Marathi News)

लीना मणिमेकलाई यांच्या 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरने चांगलाच गोंधळ निर्माण केला आहे. या पोस्टरमध्ये माँ काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. यासह, त्याला (तृतीयपंथ (LGBTQ समुदायाचा) ध्वजवाहक म्हणून प्रक्षेपित केले गेले आहे. मदर नेलने (LGBTQ समुदायाचा) हा ध्वज धरलेला दाखवणारे पोस्टर पाहून सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त करीत चित्रपटाचा निषेध नाेंदविण्यास प्रारंभ केला आहे.

चित्रपट निर्माते अशोक पंडित ते प्राची साध्वी यांच्यासह अनेकांनी याला कडाडून विरोध केला असून चित्रपट निर्मात्या लीना यांच्या अटकेची (arrest) मागणी केली आहे. त्यानंतर #ArrestLeenaManimekalai या हॅशटॅगसह पोस्टरला खूप रिट्विट केले जात आहे.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्याची आठवण करून देणारे ट्विट केले आहे. अशोक पंडित यांनी कन्हैयालालच्या हत्येसाठी नुपूर शर्माला दोषी ठरवणारे सर्वोच्च न्यायालय आता हिंदू देवता (मां काली) यांचा अपमान करणार्‍या चित्रपट निर्मात्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला आहे.

हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांनी या चित्रपटाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. एका व्हिडिओ संदेशात त्यांनी जय श्री राम मित्रांनो. आज मी कॅनडामध्ये राहणाऱ्या लीना या फिल्ममेकरसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. आमच्या काली मातेवर त्यांनी डॉक्युमेंट्री बनवली आहे. ज्यामध्ये तिचे धैर्य पहा, काली मातेस सिगारेट ओढताना दाखवत आहे. या चित्रपटाला नागरिकांनी (citizen) विरोध करावा.

पोस्टरवर झालेल्या गदारोळावर फिल्ममेकर लीना म्हणते...

पोस्टर आणि ट्विटर हॅशटॅगवरून तिच्या अटकेच्या संदर्भात, लीना म्हणाली की हा चित्रपट एका संध्याकाळच्या घटनांभोवती फिरतो जेव्हा काली दिसते आणि टोरंटोच्या रस्त्यावर फिरते. तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतर अथवा त्याचे पाेस्टर पाहिल्यानंतर 'अरेस्ट लीना मणिमेकलाई' हा हॅशटॅग पोस्ट करू नका तर 'लव्ह यू लीना मणिमेकलाई' (#loveyouLeenamanimekalai) हा हॅशटॅग पोस्ट करा.

टोरंटो हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. हे असे शहर आहे जिथे जवळपास सर्व जातींचे लोक राहतात. यॉर्क विद्यापीठ दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक निवडते आणि पुढील प्रशिक्षण आणि पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी पूर्ण शिष्यवृत्ती देते. सन 2020 मध्ये माझी निवड झाली असली तरी, महामारी आणि #metoo मुळे माझ्या पासपोर्टवर बंदी घालण्यात आली हाेती. मी सन २०२२ मध्ये कॅनडाला आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT