Mrunal Thakur Movie saam tv
मनोरंजन बातम्या

Mrunal Thakur Movie : "क्योंकि हर इश्क परफेक्ट नहीं होता..."; सिद्धांत-मृणाल पहिल्यांदाच एकत्र, 'दो दीवाने सहर में'चा रोमँटिक टीझर पाहिलात का?

Do Deewane Seher Mein Teaser Out : मृणाल ठाकूरचा आगामी चित्रपट 'दो दीवाने सहर में'चा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटात मृणाल सिद्धांत चतुर्वेदीसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे.

Shreya Maskar

'दो दीवाने सहर में'चा टीझर रिलीज झाला आहे.

'दो दीवाने सहर में'मध्ये मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी झळकले आहेत.

मृणाल आणि सिद्धांत पहिल्यांदा एकत्र चित्रपट करत आहेत.

अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. सध्या तिचे नाव साऊथ अभिनेता धनुषसोबत जोडले जात आहे. अशात आता मृणाल ठाकूरचा आगामी चित्रपट 'दो दीवाने सहर में'चा टीझर रिलीज झाला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा आहे. 'दो दीवाने सहर में' चित्रपटात मृणाल ठाकूर सिद्धांत चतुर्वेदीसोबत मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे.

'दो दीवाने सहर में' चित्रपटाची टीझर 19 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित करण्यात आला. टीझरमध्ये दोघेही प्रेमात बुडलेले पाहायला मिळत आहेत. टीझर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "क्योंकि हर इश्क परफेक्ट नहीं होता है, पर काफी होता है। इस शहर की एक इम्परफेक्टली परफेक्ट लव स्टोरी के गवाह बनें।" या टीझरवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. टीझरमधील म्युझिक प्रेक्षकांना खूपच आवडले आहे.

'दो दीवाने सहर में' कथा काय?

1 मिनिटाच्या या टीझरमध्ये मृणाल आणि सिद्धांतची केमिस्ट्री खूपच कमाल आहे. हा चित्रपट आजकालच्या आधुनिक प्रेम पद्धतीवर फिरतो. हा चित्रपट दोन इम्परफेक्ट लोकांची गोष्ट सांगतो. त्यांचे प्रेम मात्र परिपूर्ण आहे. पहिल्यांदाच मृणाल आणि सिद्धांतची जोडी एकत्र दिसणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटासाठी खूपच खुश आहेत. 'दो दीवाने सहर में' चित्रपटात मृणाल रोशनीची व्यक्तिरेखा तर सिद्धांत शशांकची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

'दो दीवाने सहर में' ची रिलीज डेट

'दो दीवाने सहर में' चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दो दीवाने सहर में' चित्रपट संजय लीला भन्साळी निर्मित आणि रवी उदयवर दिग्दर्शित आहे.'दो दीवाने सहर में' चित्रपटापूर्वी 13 फेब्रुवारी 2026 ला प्रदर्शित होणाऱ्या शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो' आणि शनाया कपूरच्या 'तू या मैं' चित्रपटाला तगडी टक्कर देणार आहे. '

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ऐन झेडपी निवडणुकीत शिंदेंचा ठाकरेंना झटका; बड्या नेत्यासह ३०० जणांनी सोडली साथ

Vitamin B Deficiency: सतत थकवा, चक्कर येतेय? Vitamin Bची असू शकते कमी, वेळीच ओळखा संपूर्ण लक्षणं

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये जेवणात काय काय मिळणार? वाचा मेन्यू

Maharashtra Live News Update: संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

Saina Nehwal Retirement: दुखापतीनंतर सायना नेहवालचा मोठा निर्णय; बॅडमिंटनमधून घेतली निवृत्ती

SCROLL FOR NEXT