दिशा पटानी आणि तलविंदर यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
अलिकडेच मुंबईतील एका कार्यक्रमात दोघे एकत्र स्पॉट झाले.
इव्हेंटमध्ये दोघे हातात हात घालून फिरताना दिसले.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. ती गायक तलविंदरलास (Talwiinder) डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर खूप काळापासून सुरू आहे. मात्र दोघांनीही अद्याप आपल्या नात्याची अधिकृत माहिती दिली नाही. मात्र आता दिशा पटानी आणि तलविंदरने आपले नाते अधिकृत केल्याचे चाहते बोलत आहेत. डेटिंगच्या अफवांनंतर अखेर दिशा आणि तलविंदर एकत्र स्पॉट झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर दिशा आणि तलविंदरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात दोघे एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. रविवारी मुंबईतील लोल्लापलूझा इंडिया (Lollapalooza India) कार्यक्रमात दोघे हातात हात घालून फिरताना दिसले. दिशा आणि तलविंदर फॅन्सच्या गर्दी समोरून जात होते. त्यामुळे दोघांनी आपले नाते जाहीर केल्याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. दोघे एकाच कारमध्ये बसून जाताना दिसले.
व्हिडीओत दोघेही आनंदी दिसत आहेत. कार्यक्रमात तलविंदरच्या चेहऱ्यावर मास्क लावला आहे. दोघेही कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसत आहेत.दिशा पाटनीने ऑफ शोल्डर व्हाइट क्रॉप टॉप आणि ब्लू जीन्स घातली आहे. अलिकडेच दोघेही उदयपूरमध्ये नुपूर सॅनन आणि स्टेबिन बेनच्या लग्नात ते दिसले, तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. मात्र आता चाहते त्या दोघांच्या नात्याच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.
तलविंदर सिंह सिद्धू ज्यांना इंडस्ट्रीत तलविंदर म्हणून ओळखले जाते. हा एक प्रसिद्ध पंजाबी गायक, गीतकार आणि संगीत निर्माता आहे. नोव्हेंबर 1997 मध्ये पंजाबमधील तरन तारण येथे त्याचा जन्म झाला. तो लहानाचा मोठा सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये झाला. त्याचे संगीत पंजाबी लोककला आणि हिप-हॉप, R&B, ट्रॅप व सिंथ-पॉप यांसारख्या जागतिक शैलींचे मिश्रण आहे. तलविंदर खूपदा त्याच्या चेहऱ्याला मास्क लावून किंवा चेहरा रंगवलेला दिसतो. त्याला त्याचे आयुष्य वैयक्तिक ठेवायला आवडते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.